घरकूल बांधकामाचे अनुदान अडल्याने लाभार्थी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:38+5:30
चार हजार लोकवस्ती आणि जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आली आहे. गरीब लाभार्थ्यांचे बचत खात्यावर अनुदानाचा प्रथम हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामुळे आशावादी असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी स्वत:चे जुने जमीनदोस्त करीत शेजारी तंबुत वास्तव्यास करण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची राशी प्राप्त झाली नाही. यामुळे चुल्हाड गावात अनेकांचे घरकुलांचे बांधकाम अडली आहे. लाभार्थ्यांचा संसार उघड्यावरच सुरु असल्याने तत्काळ अनुदान देण्याची मागणी गुड्डू शामकुवर यांनी केली आहे.
चार हजार लोकवस्ती आणि जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आली आहे. गरीब लाभार्थ्यांचे बचत खात्यावर अनुदानाचा प्रथम हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामुळे आशावादी असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी स्वत:चे जुने जमीनदोस्त करीत शेजारी तंबुत वास्तव्यास करण्यास सुरुवात केली आहे. प्रथम हप्ताची राश्ी आखडती असताना उसनवारीवर लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचे साहित्य खरेदी केले आहेत. यात रेती, गिट्टी आणि सीमेंटचा समावेश आर्हं. २० हजार रुपयाचे अनुदानातून घरकुल बांधकामाचा चबुतरा तयार केला आहे. या बांधकाम लाभार्थ्यांना ५० हजार रुपये खर्च झाले आहेत. ३० हजार रुपयांचा कर्ज झाले असताना शासनाने दुसºया हप्त्यांची राशी लाभार्थ्यांचे खात्यात वळते केले नाही. शासकीय अनुदान प्राप्त झाले नसल्याने घरकुलांचे बांधकाम थांबविण्यात आले आहेत. थकीत राशीसाठी त्यांची भांडणे सुरु झाली आहे. उर्वरीत साहित्य उचल करणार असल्याचे बजावित आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे अडचणीत वाढ झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यात लग्नसराईला सुरुवात होत असल्याने उघड्यावर असणारे घरातील साहित्य सोडून जाता येणार नाही. शासनाने विलंबामुळे अनेकांना लग्न कार्याला मुकावे लागणार आहे. चार टप्प्यात शासन अनुदानाची राशी लाभार्थ्यांचे खात्यात जमा करीत आहेत. एका हप्त्याची जमा करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागत असल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वाकडे जलद गतीने जात नाही. सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. तंबूत संसाराचा गाडा रेटत असणाºया लाभार्थ्यांची वाताहत सुरु आहे.
जलद गतीने अनुदान राशी बचत खात्यात जमा करण्यासाठी चुल्हाड बस स्थानक राज्यमार्गावर गुड्डू शामकुवर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात वंचित लाभार्थ्यांनी दिली आहे. त्यांनी या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.