निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 11:42 PM2021-10-05T23:42:18+5:302021-10-05T23:43:47+5:30

२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत.

Beneficiaries living in slums are ineligible | निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी :  विधवा, दिव्यांग, निराश्रित व झोपडीत राहणाऱ्या लाभार्थ्यांनाच घरकुलापासून वंचित ठेवले गेले. असे लाभार्थी अपात्र कसे होऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
मोहाडी तालुक्यात ७७ ग्रामपंचायती आहेत. २०१८  मध्ये ग्रामसभेतून घरकुल लाभार्थ्यांची यादी ‘’ड’’ मागविण्यात आली.  त्या याद्या मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आल्या होत्या. मंजुरीसाठी पाठविलेल्या २० हजार ९३४  पैकी १५ हजार ८८६ लाभार्थी पात्र ठरले. ५ हजार २४ लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे परत सर्वेक्षण करण्यात यावे.
२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन लोकांची नावे आहेत. असे अनेक लाभार्थी अपात्र ठरले. एवढेच नाही, तर ज्यांची झोपडी आहे, असेही लाभार्थी अपात्र ठरविले गेले आहेत. त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात पडक्या घरात व झोपडीत राहावे लागले. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, असे केंद्र शासनाने जाहीर केले होते. तसेच निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे कायम करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायतींनी पाठविलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव शासनदरबारात पडून आहेत. गरिबांना घरे मिळवीत यासाठी व  मोहाडी तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व पात्र घरलेल्या घरकुलांचे सर्वेक्षण  पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले आहे.

झोपडीत राहणारी कविता अपात्र 
सर्व लोकांना घरे देण्याची योजना नावाची आहे. हरदोली येथील झोपडीत राहणारी विधवा असणारी कविता झंझाड या विधवेला अपात्र ठरवून घरकुल मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
एकाच गावाची तीनशे घरकुले अपात्र
जांभोरा ग्रामपंचायतीमधील  ३१८  घरकुलांचे नाव यादीतून  बाद करण्यात आले आहे. तसेच पालोरा २९५, आंधळगाव २५९, डोंगरगाव २००, हरदोली १७८, कुशारी २१०, मांडेसर १८८, रोहा २१७ ,पिंपळगाव १७८ अशा ७७ ग्रामपंचायतींमधून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

 

Web Title: Beneficiaries living in slums are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.