मोहरी येथील लाभार्थी घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:00 AM2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:25+5:30

गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ब मध्ये ३० या क्रमांकावर आहे. तरीही त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही.

The beneficiary in Mohri is deprived of housing | मोहरी येथील लाभार्थी घरकुलापासून वंचित

मोहरी येथील लाभार्थी घरकुलापासून वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देयादीत मात्र नाव समाविष्ट : लाभ देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा चौ : घरकूल योजना ही गरीब गरजू भुमिहिन शेतमजूरांना वरदार ठरत आहे. मात्र ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे गरजू लाभार्थी कोसो दूर आहे. धामणी येथील एकनाथ झिंगरु शहारे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘ब’ मध्ये नाव असून घरकूल यादीतील ५२ परिशिष्ट ब मध्ये ३० या क्रमांकावर आहे. तरीही त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही.
घरकूल मिळावे म्हणून त्यांनी संबंधित विभागाला निवेदन दिले. तरीही कुणीही भिरकावून पाहिले नाही. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी आहे.
पवनी पचांयत समितीच्या भोंगळ कारभाराने अगोदरच जनता त्रस्त झाली आहे. लाभार्थ्यांची घरकूलासाठी निवड करणे हे जरी ग्रामपंचायतीचे काम असले तरी मात्र तो लाभार्थी योग्य आहे किंवा नाही हे काम पंचायत समितीचे आहे, पण तसे होत नाही.
गरजू लाभार्थ्यांना डावलून दुसऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे. धामणी येथील एकनाथ शहारे हा येथील भुमिहिन शेतमजूर आहे. त्यांचे घर मातीचे आहे. पावसाचा तडाखा सहन करीत कुटूंब पडक्या घरात राहत आहे.
गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून ग्रामपंचायत स्तरावर चौकशी करण्यात यात ग्रामसभेत पाच लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात या लाभार्थ्यांचा समावेश आहे. मात्र यांचे नाव यादीमध्ये असताना सुध्दा नाव ऑनलाईन आले नाही म्हणून त्यांना मागील तीनवर्षापासून कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहे.
ग्रामपंचायतीने ही यादी पंचायत समितीला दिली. ती यादी आॅनलाईन करुन शासनाकडे पाठविणे ही जबाबदारी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे आहे. ज्या लाभार्थ्यांचे नाव मागे आहेत. त्यांचे बांधकाम सुध्दा सुरु झाले आहेत. मात्र या लाभार्थ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा लाभार्थी या योजनेपासून कोसो दूर आहे. राहते घर पडल्यावर एखाद्याचा जीव गेलवर प्रशासनाला जाग येईल काय? असा प्रश्न या लाभार्थ्याला पडला आहे.

Web Title: The beneficiary in Mohri is deprived of housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.