शेतकऱ्यांना मिळणार नेरला उपसा सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:18 PM2019-07-15T23:18:44+5:302019-07-15T23:19:08+5:30

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

Benefits of irrigation irrigation will be given to farmers | शेतकऱ्यांना मिळणार नेरला उपसा सिंचनाचा लाभ

शेतकऱ्यांना मिळणार नेरला उपसा सिंचनाचा लाभ

Next
ठळक मुद्देदखल 'लोकमत'ची : साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. 'पऱ्हे जगविण्यासाठी बळीराजाची धडपड' या आशयाचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच नेरला उपसा सिंचन प्रकल्प प्रशासन खळबळून जागे झाले. त्यांनी पाण्याची पातळी वाढविण्याच्या कामाला प्रारंभ केला असून लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
माहितीनुसार, नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी २४१.२९ एवढी पाण्याची पातळी असणे अतिआवश्यक आहे. त्यामुळे ही पातळी जोपावेतो पूर्ण होणार नाही तोपावेतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकणार नाही त्यासाठी गोसेखुर्द धरणाचे वक्रव्दार बंद केले आहे. आता प्रकल्पात पाण्याची पातळीकिती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत मात्र कुठलीही माहिती नाही. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत भाजपचे पवनी तालुकाध्यक्ष सुरेंद्र आयतुलवार यांनी नेरला उपसा सिंचनाला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा केली. यासंबधी किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, अमोल उराडे, भगवान करंजेकर, कुलदीप उराडे, चेतन भानारकर व शेतकºयांनी नेरला उपसा सिंचनला भेट दिली असता अधिकारी व कर्मचाºयांमध्ये उदासीनता दिसून आली. नेरला उपसा सिंचनामध्ये असलेले पाणी यापुर्वीच गोसेखुर्द धरणात सोडण्यात आहे. त्यामुळे सध्यस्थितीत पाण्याची पातळी खालावली आहे. आता अधिकारी ‘साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न’ करीत आहे. तोपर्यत मात्र शेतकरी देशोधडीला लागलेला दिसेल, अशी संतप्त प्रतिक्रीया दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्याप्रमाणे पाण्याची पातळी वाढवायला सुरूवात झाली आहे. नेरला उपसा सिंचन सुरू व्हायला कमीत कमी जेवढी पातळी पािहजे तेवढी झाली की लगेच नेरला उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडल्या जाणार आहे.
-अमोल वैद्य, सहायक अभियंता, नेरला उपसा सिंचन प्रकल्प

Web Title: Benefits of irrigation irrigation will be given to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.