३०० दिव्यांगांना मिळणार युनिक कार्डचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:18 PM2018-03-25T23:18:55+5:302018-03-25T23:19:17+5:30
दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार्ड बनवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
आॅनलाईन लोकमत
वरठी : दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार्ड बनवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यात ४०० दिव्यांग लोकांनी हजेरी लावली त्यापैकी ३०० लोकांना युनिक कार्ड योजनेत सहभागी करण्यात आले. दिव्यांगांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने सोमवारला पुन: शिबीर आयोजन करण्याची घोषणा केली.
दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी विशेष सवलत देण्यात येते. यासाठी रेल्वे विभाग विशिष्ठ कार्ड धारकांना सवलत देते. यासाठी अनेक प्रक्रिया असून दिव्यांगांना शासनस्तरावर देण्यात येणारे प्रमाणपत्र व रेल्वे विभागाचे फॉर्म भरून पुन: जिल्हा स्तरावरून पडताळणी करून पुन: रेल्वे विभाग नागपूर यांचेकडे कागदपत्र सादर करावी लागत होते. एकंदरीत सर्व प्रक्रिया त्रासदायक होती. यामुळे लाभार्थ्यांना शारीरिक व आर्थिक त्रास होत होता. दिव्यांगांना होणार त्रास लक्षात घेऊन रेल्वे विभागाने सादर प्रकारचे युनिक कार्ड वाटप व योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रेल्वे स्टेशनवर लोकांची गर्दी होती. शिबिराला उपस्थित लोकांकडून मूळ कागदपत्र तपासल्या नंतर ३०० दिव्यांगांना लाभार्थी म्हणून कार्ड वाटप होणार आहेत.
कार्यक्रमास आमदार चरण वाघमारे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, भाजप च्या दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोकाला चौधरी, वरिष्ठ मंडळ अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळ वाणिज्य अधिकारी डी एस. तोमर, माजी सरपंच निरंजना साठवणे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी सभापती हरिश्चंद्र बधाटे, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सी के टेम्भूर्णीकर उपस्थित होते.
यावेळी भंडारा सामान्य रुग्णालयाचे मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ रत्नाकर बांडेबुचे, डॉ प्रदीप आनंद, डॉ विनोद गडसिंघ, डॉ प्रदीप आकरे, विकास गभणे, स्नेहा मेश्राम व माधुरी साखरवाडे यांनी दिव्यांगांना पडताळणी केली.
रेल्वे विभागाव्दारे वाटप होणा?्या युनिक कार्डचा वापर प्रवाशांना आनलाईन तिकीट काढण्यासाठी सुद्धा करण्यात येणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या शिबिरात सहभाग घेतलेल्या दिव्यांगांना आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते युनिक कार्ड वाटप करण्यात आले.
आज पुन्हा शिबीर
भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे आयोजित शिबिरात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग नोंदवला. अनपेक्षित गर्दी झाल्यामुळे पाहिजे त्या कालावधीत शिबिरात सहभागी लोकांना लाभ देता आले नाही. त्यामुळे सादर शिबिर सोमवारला आयोजित केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.