५११ दिव्यांगांना मिळणार युनिक कार्डचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:15 AM2018-03-30T01:15:25+5:302018-03-30T01:15:25+5:30
दक्षिण मध्य रेल्वे, नागपूर यांच्या विद्यमाने भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे दिव्यांगां करीता विशेष शिबीर घेण्यात आले. दोन दिवशीय शिबिरात ५११ दिव्यांगांची युनिक कार्ड करिता निवड करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
वरठी : दक्षिण मध्य रेल्वे, नागपूर यांच्या विद्यमाने भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे दिव्यांगां करीता विशेष शिबीर घेण्यात आले. दोन दिवशीय शिबिरात ५११ दिव्यांगांची युनिक कार्ड करिता निवड करण्यात आली. रेल्वेने प्रवेश करण्यासाठी या सवलत कार्डचा वापर करण्यात येतो. सदर कार्ड धारकांना सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवाशाकरिता वापरता येत असून आॅनलाइन तिकीट बुकिंग करताना सुद्धा उपयोगी पडणार आहे.
कार्यक्रमास आमदार चरण वाघमारे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, भाजपच्या दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोकाला चौधरी, वरिष्ठ मंडळ अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळ वाणिज्य अधिकारी डी एस. तोमर, माजी सरपंच निरंजना साठवणे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी सभापती हरिश्चंद्र बधाटे, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल नारनवरे, रवी लांजेवार, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सी के टेम्भूर्णीकर उपस्थित होते.
यावेळी भंडारा सामान्य रुग्णालयाचे मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ रत्नाकर बांडेबुचे, डॉ प्रदीप आनंद, डॉ विनोद गडसिंघ, डॉ प्रदीप आकरे, विकास गभणे, स्नेहा मेश्राम व माधुरी साखरवाडे यांनी दिव्यांगांना पडताळणी केली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी हजेरी लावली होती. अपुरी व्यवस्था व कार्डसाठी झालेली गर्दी लक्षात ठेवून रेल्वे विभागाने एक दिवसाची वाढ करून शिबीर घेण्यात आले. दोन दिवसात एकूण ५११ दिव्यांगांची आवश्यक ती कागदपत्र तपासून त्यांना युनिक कार्ड वाटप करण्यासाठी असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. लवकरच सर्व दिव्यांगांना युनिक कार्ड वाटप करण्यात येतील.