सावधान कर्णकर्कश हॉर्न वाजविणे पडू शकते आता महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:05+5:302021-06-30T04:23:05+5:30

बॉक्स तरुणांमध्ये वाढती क्रेझ फॅन्सी हॉर्न आपल्या दुचाकीला बसवून अनेकदा १८ ते ३० या वयोगटातील भंडारा, साकोली तुमसर शहरातील ...

Beware the honking horn may be expensive now | सावधान कर्णकर्कश हॉर्न वाजविणे पडू शकते आता महागात

सावधान कर्णकर्कश हॉर्न वाजविणे पडू शकते आता महागात

Next

बॉक्स

तरुणांमध्ये वाढती क्रेझ

फॅन्सी हॉर्न आपल्या दुचाकीला बसवून अनेकदा १८ ते ३० या वयोगटातील भंडारा, साकोली तुमसर शहरातील काही तरुण नियम पायदळी तुडवत अचानक मागून येत कर्णकर्कश हॉर्न वाजवत पुढे जातात. यामध्ये पादचाऱ्यांना रस्त्याने जाताना त्रास होतो. हे कर्णकर्कश हॉर्न फक्त दुचाकीलाच नव्हे तर अनेक ट्रक, ट्रॅव्हल्स, बुलेट, रिक्षा अशा गाड्यांनाही फॅन्सी हॉर्न बसविण्याची फॅशन सुरू आहे. अशा वाहनांचा आवाज मात्र नागरिकांच्या कानाला नकोसा वाटतो. त्यामुळे अनेकदा हॉर्न वाजल्याने नागरिक त्रस्त होतात.

बॉक्स

कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर ...

कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनांना दंड निश्चित करण्यात आला आहे. भंडारा शहरात काही भागात रस्त्यावरून अशी वाहने धावतात. मात्र अमुक एका मार्गाने जात अचानक वाहन हॉर्न वाजवत निघतात. त्यामुळे अंतर्गत भागातील अशा वाहनांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

बॉक्स

कानांचेही आजार वाढू शकतात

रस्त्यावरून जाताना वाहनांचे वाजणारे कर्णकर्कश आवाजही कानांचे आजार वाढू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्णकर्कश आवाजामुळे डोकेदुखी तसेच मानसिक त्रास अलीकडील काळात वाढलेला दिसून येतो. वृद्ध नागरिक, लहान बालके, मोठ्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांना बहिरेपणा येण्याची ही भीती असते. घरात शांत झोपलेले व्यक्ती अथवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग झाल्यानंतर पुन्हा एकाग्रता मिळण्यासाठी वेळ खर्ची होतो.

विद्यार्थी, तरुणांमध्ये जनजागृती

जिल्हा वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये तसेच अन्य ठिकाणी वाहतूक नियम तसेच अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकाणी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आले होते. वाहतूक नियम जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगली जनजागृती झाली असून वाहतूक नियमांचे पालनही केले जात आहे.

Web Title: Beware the honking horn may be expensive now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.