लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:35+5:302021-08-18T04:42:35+5:30

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : डिजिटल पेमेंट प्रणालीत अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यातच ...

Beware of lottery e-mails or messages! | लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!

googlenewsNext

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : डिजिटल पेमेंट प्रणालीत अनेकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत. त्यातच लॉटरी लागल्याचे संदेश येताच नागरिकही लोभापायी त्याला प्रतिसाद देतात. मात्र अकाउंट रिकामे होताच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसात धाव घेतात.

उल्लेखनीय म्हणजे जून महिन्यात एका इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असलेल्या तरुणाला एका भामट्याने ऑनलाइन पद्धतीने चुना लावला. त्याच्या खात्यातून तब्बल ४० हजार रुपये लंपास करण्यात आरोपीला यश आले. सांगूनही नागरिक आमिषाला बळी पडतात. यावर सजगता बाळगणेच अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

बॉक्स

ही घ्या काळजी

लॉटरी लागल्याचे ई मेल किंवा ई संदेश आल्यावर ते उघडून पाहू नयेत, उघडले तरी त्यावर असलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नये. याच लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मागितली जाते. अनेक जण हीच वैयक्तिक माहिती शेअर करतात. यात बँकेचे खाते नंबर, एटीएम, कार्ड नंबर, सीव्हीसी, कोड नंबर यासह कधी कधी एटीएम पीन नंबरही शेअर करतात. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. परिणामी, असे ई मेल किंवा संदेश आले तर त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. तरच लहान-मोठ्या फवणुकीपासून सावध राहू शकतो. हीच काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बॉक्स

वेबसाईटची सुरुवात ‘एचटीटीपीएस’पासून झाली आहे का?

सामान्यत: बहुतांश वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून होत असते. यामुळेच नागरिकांचा सहजपणे आलेल्या ई मेल संदेशावर पटकन विश्वास बसतो. भरोसा करीत ई मेल उघडून वैयक्तिक माहिती शेअर केली जाते. तिथेच नागरिकांची फसवणूक होत असते. अशा सदोष वेबसाईडच्या लिंकिंगपासून सावध राहावे. या शब्दापासून सुरू होणारी वेबसाईट खरी असेल, असे नाही.

बॉक्स

लॉटरी लागली म्हणून पाच लाख उकळले

केस १ : दोन वर्षांपूर्वी एका ४० वर्षीय इसमाला लॉटरी लागली म्हणून त्याला त्याची रक्कम मिळण्यासाठी वैयक्तिक माहिती मागविण्यात आली. वैयक्तिक माहिती देताच त्याच्या बँक खात्यातील ६० हजार रुपये लगेच नाहीसे झाले. लॉटरीच्या आमिषापोटी स्वत:चेही पैसे गमावून बसण्याची वेळ आली.

केस २ : पेशाने इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असलेल्या एका तरुणाला असाच एक संदेश आला. त्यानंतर मोबाइलवरून त्याला त्याची वैयक्तिक माहिती मागविण्यात आली. शिक्षित असूनही या अभियंत्याने माहिती शेअर केली. क्षणिक लोभापाई खात्यातील रक्कम मात्र अलगदच लंपास करण्यात आली.

Web Title: Beware of lottery e-mails or messages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.