वीज कापण्याच्या धमक्या दिल्या तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:42+5:302021-02-05T08:42:42+5:30

साकोली परिक्षेत्र नक्षलग्रस्त असूनही २० तास वीजपुरवठा का नाही, यापूर्वी शेकडोंच्यावर शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना वीजजोडणी का नाही, लॉकडाऊनमधे ...

Beware of power outages | वीज कापण्याच्या धमक्या दिल्या तर खबरदार

वीज कापण्याच्या धमक्या दिल्या तर खबरदार

Next

साकोली परिक्षेत्र नक्षलग्रस्त असूनही २० तास वीजपुरवठा का नाही, यापूर्वी शेकडोंच्यावर शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना वीजजोडणी का नाही, लॉकडाऊनमधे शेतकरी चिंतातूर व आर्थिक संकटाचा सामना करीत असून विद्युत विभागाकडून त्यांना वीज कनेक्शन कापण्याच्या धमक्या दिल्या जातात. लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिले माफ करण्यात येईल, असे शासनाकडून संकेत होते. पण याउलट भरमसाठ वीजबिले लादून सामान्य शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची व वीज कापण्याच्या धमक्या खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा आहे. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजयराव तुमसरे, नगराध्यक्षा धनवंता राऊत, इंद्रायणी कापगते, लखन बर्वे, ॲड. मनीष कापगते, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे, सरपंच प्रेमकुमार गहाणे, तुकाराम खरकाटे, देवेंद्र लांजेवार, रवींद्र खंडाळकर, शारदा लांजेवार, राजश्री मुंगुलमारे, नरेंद्र वाडीभस्मे, किशोर पोगडे, नितीन खेडीकर, वनिता डोये, भूमिता धकाते, उषा डोंगरवार आदी उपस्थित होते.

Web Title: Beware of power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.