भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

By admin | Published: April 14, 2017 12:34 AM2017-04-14T00:34:18+5:302017-04-14T00:34:18+5:30

मुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.

Bhagwat Samiti performed the role of parents and brother | भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

Next

नवदाम्पत्यांनाही आवरता आले नाही अश्रू : सामूहिक विवाह सोहळ्यातील हृदयस्पर्शी प्रसंग
विशाल रणदिवे  अड्याळ
मुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. जेव्हा मुलगी विवाह होऊन माहेर सोडून सासरी जाते, तो क्षण मात्र आजही आधुनिक युग असले तरी मुलगी तिचे भाऊ बंध, आईवडील हे सर्व कुणी डोळ्यातून अश्रू पाडतात तर कुणी मनातल्या मनात. मुलगी आपली ताई, आपल्या पोटचा गोळा नेहमीसाठी परघरी जाते त्याचे दु:ख आणि तिचा विवाह आल्याचा आनंद मानत असतात.
अड्याळ नगरीत हनुमान जयंती निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. यावर्षीही सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहा जोडपी विवाहबद्ध झाले. विवाह संपन्न झाल्यानंतर परंपरेनुसार मुलीची ‘पाठवणी’ केल्या जाते. तसेच घरच्यासारखे कार्यक्रम या सामूहिक विवाह सोहळ्यात भागवत समितीने व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केल्यामुळे सोहळ्यात असलेल्या उपस्थितीत मंडळींनी भागवत समितीचे आभार मानले. लग्नानंतर मुलीला मुलाच्या स्वाधीन करताना जी परंपरा आहे ती परंपरा पहिल्यांदाच सामूहिक विवाह सोहळ्यात पार पडत असताना भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गभणे, सचिव राजेश गभणे, समितीचे संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी थोरामोठ्यांनी सहकार्य केले. मंडपात बसलेल्या हजारो लोकांना महिला तसेच बालकांना सांभाळणे म्हणजे तारेवरची करसरतच यासाठी पोलीस विभाग सुद्धा सज्ज होते.
अड्याळ येथे ज्यांनी भागवत सप्ताह सुरु केले, ते आज म्हातारे झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा सल्ला, मार्गदर्शन युवा पिढीला लाभत असल्यामुळे या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम आहे.
या वरवधू ‘पाठवणी’ कार्यक्रमात या सोहळ्यात ज्या मुलींनी विवाह केला. त्यांच्या मते भागवत समितीने आईवडील व भाऊ बहिण सख्खे रक्ताचे नाते असल्यासारखे आज सासरी जातेवेळी वाटत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Bhagwat Samiti performed the role of parents and brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.