कऱ्हांडला येथे भागवत सप्ताह
By admin | Published: December 25, 2015 01:41 AM2015-12-25T01:41:30+5:302015-12-25T01:41:30+5:30
साधू संत येती घरा तोचि दिवाळी, दसरा याप्रमाणे कऱ्हांडला गावाला अनेक साधू संताचे आगमन झाल्याने गावामध्ये ईश्वरनामाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे.
संतांची मांदियाळी : गावाला आले जत्रेचे स्वरुप
कऱ्हांडला : साधू संत येती घरा तोचि दिवाळी, दसरा याप्रमाणे कऱ्हांडला गावाला अनेक साधू संताचे आगमन झाल्याने गावामध्ये ईश्वरनामाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे. श्री हनुमान देवस्थान कमेटी आणि ग्रामवासी यांच्या विद्यमाने दत्तात्रय जयंती उत्सवनिमित्त १९ डिसेंबरपासून श्रीमदृ भागवत सप्ताहाचे आयोजन हनुमान देवस्थान परिसरात करण्यात आले आहे. २५ डिसेंबर रोजी भागवत सप्ताहाची सांगता होणार असून दुपारी १२.३० वाजता गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भागवत सप्ताहामुळे गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. हभप रामभाऊ ढोबळे महाराज मु. सिंगोरी जि. नागपुर यांच्या संगीतमय अमृततुल्य वाणीतून श्रीमद् भागवत गितेवर प्रवचनानी भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. गावामध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून तोरणे पताक्यानी, रांगोळी घालुन संपूर्ण गाव सजवून जणु गावामध्ये विठ्ठल नगरी पंढरपूर अवतरल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे. काकड, रामधून ................ यात्रा, प्रवचन, हरिपाठ, ग्रामसफाई कार्यक्रमाचा समावेश दैनंदिन समावेश आहे.
रामा ढोरे - बघणारे थक्क
हे आहे कऱ्हांडला गावाचे मुख्य प्रवेशद्वार बांबुच्या सहाय्याने प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली. गावामध्ये येणारे-जाणारे अधिकारी, नागरिक यांच्या स्वागतासाठी नमस्कार करुन स्वागत करण्यासाठी दोन सारख्या पुतळ्याची निर्मिती प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हे दृष्य बघणारांचे लक्ष वेधून घेत आहेत. लाखांदूर पवनी मार्गावर गावाचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने प्रवासी हे देखावेपाहून आणि त्यांचे अवलोका करुन थक्क होत आहेत. कऱ्हांडला गाव संपूर्ण स्वच्छतेवर भर देत असतून आदर्श गाव होण्याकडे वाटचाल करत आहे. अल्पावधीतच गावकऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. गावामध्ये भागवत कथेचे आयोजन सुरु असुन येणाराचे मन प्रसन्न होत आहे. प्रवेशद्वारा आणि स्वागताची प्रतीकृती आनंदराव ढोरे, मुरलीधर मैंद, हिरामण देशमुख, मार्र्कंड राऊत यांच्या कल्पनेतून आणि हस्तकलेतून स्वागत करणारे पुतळे आणि प्रवेशद्वार निर्मिती केली आहे. (वार्ताहर)