भाग्यश्री बोरकर सुवर्णपदाची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:23+5:302021-02-11T04:37:23+5:30

मोहाडी : चीचखेडा या छोट्याशा गावाची बी. ए. अंतिम वर्षाची मुलगी भाग्यश्री घनश्याम बोरकर हिने कला शाखेत बी.ए. ...

Bhagyashree Borkar gold medalist | भाग्यश्री बोरकर सुवर्णपदाची मानकरी

भाग्यश्री बोरकर सुवर्णपदाची मानकरी

Next

मोहाडी : चीचखेडा या छोट्याशा गावाची बी. ए. अंतिम वर्षाची मुलगी भाग्यश्री घनश्याम बोरकर हिने कला शाखेत बी.ए. मध्ये भंडारा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकिकास आणले. बी.ए. च्या तिन्ही वर्षात एकूण सहा सत्रांमध्ये तिने ३००० पैकी २४७० मार्क मिळवून ८२.३३ टक्के गुण प्राप्त करून भंडारा जिल्ह्यात प्रथम स्थान पटकाविले. महाविद्यालयासोबतच आपल्या कुटुंबीयांचे तसेच चीचखेडा या छोट्याशा गावाचे नाव मोठे केले आहे. स्व. मनोहरभाई पटेल जयंतीच्या निमित्ताने तिला महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन आदी उपस्थित होते. ती यशाचे श्रेय तिची आई शकुंतला बोरकर तसेच वडील घनश्याम बोरकर, नेहमी तिच्या पाठीशी असणारा तिचा मोठा भाऊ शुभम बोरकर, इतिहासाचे प्राध्यापक डॉ.सुनील चवळे व समस्त प्राध्यापक वर्ग व मित्रमंडळींना दिले आहे. याच परीक्षेत अंतिम सत्रामध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळवून विद्यापीठात प्रथम स्थान मिळवणारा वैभव ऊर्मिला उल्हास चोपकर (रा. पिंपळगाव) या विद्यार्थ्यानेही इतिहास रचून महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे. अशा होतकरू विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन इतरही विद्यार्थ्याने यशाचे शिखर गाठत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bhagyashree Borkar gold medalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.