भंडारावासी दूषित पाणी पिण्यास बाध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:24 PM2017-10-02T23:24:58+5:302017-10-02T23:25:22+5:30

शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

The Bhandara bound to drink contaminated water | भंडारावासी दूषित पाणी पिण्यास बाध्य

भंडारावासी दूषित पाणी पिण्यास बाध्य

Next
ठळक मुद्देपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : विविध आजारांना खतपाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शुद्ध पाण्यासाठी भंडारावासीयांचे नशीब बलवत्तर नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या उपरही भंडारावासीयांना दूषित पाणी पिण्यास पालिका प्रशासन बाध्य करीत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठे काळेकुट्ट पाणीपुरवठा तर कुठे पाण्यासाठी बोंब ही बाब नित्याचीच झाली आहे.
दीड लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भंडारा शहरात पाण्याची ही मुख्य समस्या आहे. परंतु ही समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन सपेशल फेल ठरली आहे. सत्ता कुणाचीही असो, मुलभूत सुविधांच्या विशेषत: जल हे जीवन आहे, असे म्हणत असतानाही शुद्ध पाण्याच्या पुरवठेबाबत पालिकेने कधीही गांभीर्याने घेतले नाही. दोन दशकांपासून पाण्याची समस्या हळूहळू उग्र रूप धारण करीत असताना भविष्यकालीन वाढीव पाणीपुरवठा योजना कागदावरच रंगविण्यात आल्या.
नवीन योजना मंजुर व्हायला व कार्यान्वीत व्हायला बराच कालावधी शिल्लक असताना तोपर्यंत नागरिकांनी फेसाळयुक्त व घाण पाणी प्यायचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे. पाण्यासाठी पालिकेसमोर आंदोलन करणारेही आता का बोलत नाही, हा मुख्य प्रश्नही भंडारेकरांना सतावत आहे.
युद्ध पातळीवर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी लिकेज शोधत असले तरी त्यावर कधीही शंभर टक्के निराकरण होणे अशक्य बाब आहे. जलशुद्धीकरणाची क्षमताही योग्य असली तरी कालबाह्य झालेल्या जलवाहिन्यांमुळे हजारो नागरिकांचा जीव दूषित पाण्यामुळे धोक्यात आला आहे.
शहरातील मोठा बाजार परिसर, माधवनगर परिसर, खात रोड, शुक्रवारी परिसर, मेंढा परिसरासह शहरातील बहुतांश भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.
मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकार
शहराच्या पूर्व उत्तर दिशेला वसलेल्या मेंढा परिसरात मागील दहा दिवसांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. नागरिक पाण्यासाठी तरसत असताना पालिका प्रशासनाचे दुटप्पी धोरण नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. महिला-पुरूष सकाळपासून पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसून येतात. याबाबत पालिका प्रशासनाला कळवूनही पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही.

Web Title: The Bhandara bound to drink contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.