भंडारा बसस्थानकात रापमंचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:00 AM2019-06-03T01:00:08+5:302019-06-03T01:00:33+5:30

येथील बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे, सनफ्लॅग शाळेचे प्राचार्य चौबे, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ.चंद्रशेखर वडस्कर, सुरक्षा व दक्षता अधिकारी धनभाते, कामगार अधिकारी भारती कोसरे प्रामुख्याने उपस्थित होते.

At the Bhandara Bus Stand, the enthusiasm of Rampam | भंडारा बसस्थानकात रापमंचा वर्धापन दिन उत्साहात

भंडारा बसस्थानकात रापमंचा वर्धापन दिन उत्साहात

Next
ठळक मुद्देशहिदांना श्रद्धांजली : खासदारासह वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे, सनफ्लॅग शाळेचे प्राचार्य चौबे, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ.चंद्रशेखर वडस्कर, सुरक्षा व दक्षता अधिकारी धनभाते, कामगार अधिकारी भारती कोसरे प्रामुख्याने उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने तथा मातृभूमीच्या संरक्षणात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ऐ मेरे वतन के लोगो या गीताची धुन वाजविण्यात आली. नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शहीद वीर पत्नी ज्योती सिंग्राम, उर्मिला तितीरमारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय भंडारा बसस्थानकात २२ वर्षापासून अविरतपणे थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देणारे बलवानी यांचाही खासदार मेंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगारातील ज्येष्ठ कर्मचारी सुनील पशिने, लिपीक अनिस उद्दीन खान, वाहन परिक्षक आदींचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खासदार मेंढे यांनी रापनिच्या कामाबाबत कौतूक केले. समाजसेवक, शहीदांच्या वीर पत्नी, सेवाज्येष्ठ कर्मचारी यांचा सत्कार करून रापमने समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली आहे. रापमचे चालक, वाहक व अन्य कर्मचारी नियमित व प्रामाणिकतेने कर्तव्य बजावित असतात. प्रवाशांनी ा चालक-वाहकांना सन्मानाने वागणूक द्यावी असे आवाहनही खासदार मेंढे यांनी केले.
विनोदकुमार भालेराव म्हणाले, सन २०१८ - १९ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत भंडारा विभाग ६ कोटी ३५ लक्ष रुपयाने नफ्यात होता. एप्रिल २०१९ मध्ये १ कोटी ८८ लक्ष रुपयाने नफ्यात असल्याचे सांगितले. गजानन नागुलवार यांनी रापमची कार्यपद्धती, वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य चौबे यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक आगार व्यवस्थापक फाल्गून राखडे यांनी केले. संचालन कामगार अधिकारी भारती कोसरे व आभार सहाय्यक वाहतूक अधीक्षक सारिका लिमजे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी भारती कोसरे, आगार व्यवस्थापक फाल्गून राखडे, सारिका लिमजे, वाहतूक निरीक्षक सुनील जिभकाटे, आगार लेखाकार मधुसुदन वाघाये तथा रापम कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमातून पर्यावरण संतुलनाचा संदेश
महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असल्याने पर्यावरण संदेश देण्यासाठी कार्यक्रमांतर्गत पाहुण्यांचे स्वागत हारतुºयांनी न करता विविध प्रजातींचे रोपटे देऊन करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेशही यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे बसस्थानक परिसर तोरण पताका, रांगोळ्यानी सजविण्यात आला होता.

Web Title: At the Bhandara Bus Stand, the enthusiasm of Rampam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.