भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:36+5:302021-06-25T04:25:36+5:30

या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस ...

Bhandara city to have 'highway', 'fourway' | भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

भंडारा शहरातील ‘हायवे’ होणार ‘फोरवे’

Next

या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, भंडारा आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते.

बॉक्स

सहा महिन्यात १५८ रस्ते अपघात

जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीच्या तुलनेत अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यामध्ये अतिवेगामुळे ११, असुरक्षित ड्राईव्हिंग २९, मद्य प्राशनाने एक, राँग साईडमुळे पाच व अन्य कारणांमुळे २६ जणांचा मृत्यू झाला.

बॉक्स

अतिक्रमण काढण्याचे निर्देश

भंडारा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. त्यामुळे अतिक्रमण काढणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Bhandara city to have 'highway', 'fourway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.