भंडारा जिल्ह्यात १०३ पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 06:25 PM2020-09-07T18:25:49+5:302020-09-07T18:26:27+5:30
जिल्ह्यात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २१०६ झाली आहे. ४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०१६ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २१०६ झाली आहे. ४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०१६ झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील ६८, साकोली 00, लाखांदूर ०८, तुमसर १५, मोहाडी 00, पवनी ११ व लाखनी तालुक्यातील 0१ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १०१६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या २१०६ झाली असून १०५३ क्रियाशील रुग्ण आहेत. आज २ रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ३७ झाली आहे.
आयसोलेशन वार्ड मध्ये १४१ व्यक्ती भरती असून १४३१ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४०९० व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात १४२४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १२६६६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.