भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

By admin | Published: May 27, 2017 12:18 AM2017-05-27T00:18:06+5:302017-05-27T00:18:06+5:30

अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

In Bhandara district 1642 Gharkul can be completed | भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

Next

२० मे ते १० जूनपर्यंत विशेष मोहीम : राज्यात १,५७,५१६ घरकुलांचा समावेश
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. २० मे ते १० जून या कालावधीमध्ये अपूर्ण घरकुले पूर्ण करणेची विशेष मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ३० मे पर्यंत राज्य व्यवस्थापन कक्ष संचालकांना पाठविणे आवश्यक आहे. न पाठविल्यास ही बाब ग्रामविकास सचिवांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात अपूर्ण असणाऱ्या घरकुलांपैकी सर्वसाधारणपणे किमान ७५ टक्के घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. घर हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. घरकुले पूर्णत्वाकरिता शासनस्तावर गंभीर दखल घेण्यात आली असून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे याकरिता ग्रामविकास मंत्रालय गंभीर आहे.
भंडारा जिल्ह्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये ७१५०१२ घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ५०४९९१ घरकुले पूर्ण झाली. अपूर्ण घरकुलांची संख्या २१००२१ असून त्यांची टक्केवारी २९ इतकी आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १५७५१६ घरकुले पूर्णत्वास येणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात एकूण मंजूर घरकुले ९८४५, पूर्णत्वास आलेली घरकुले ८२०३, अपूर्ण घरकुलांची संख्या १६४२ इतकी आहे. या विशेष मोहितेअंतर्गत १२३२ घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अहमदनगर १४१४०, अकोला ३८७८, अमरावती १२६६८, औरंगाबाद ५९३८, बीड ३५९४, बुलडाणा ४०६९, चंद्रपूर ५२००, धुळे १०६४१, गडचिरोली ९१९७, गोंदिया ९५८६, हिंगोली २५६४, जळगाव ९६०२, जालना ४६८५, कोल्हापूर २५१६, लातूर ४९२५, नागपूर १६९३, नांदेड ९८९१, नंदूरबार १६४६५, नाशिक १६९१४, उस्मानाबाद ३१४०, पालघर ५८०२, परभणी २३६७, पुणे ५२५८, रायगड ३०२८, रत्नागिरी ७८५, सांगली २९९८, सातारा २७७३, सिंधुदुर्ग २२९, सोलापूर ७५७९, ठाणे १४०५, वर्धा १२०१, नाशिक ६१५९, यवतमाळ १७४८९ अशी संख्या आहे.
अपूर्ण घरकुलांची यादी, त्यांची कारणे, लाभार्थ्यांची रद्द झालेली घरकुले, काम सुरू न झालेले घरकुले यांची सविस्तर माहिती विविध नमुन्यातील अर्जात शासनाला सादर करावयाची आहे, असे निर्देश राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र संचालक शेंडगे यांनी पाठविले आहे.

Web Title: In Bhandara district 1642 Gharkul can be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.