भंडारा जिल्ह्याला  गारांसह वादळी पावसाचा तडाखा; भाजीपाला व उन्हाळी धान पीक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 07:10 PM2023-05-27T19:10:16+5:302023-05-27T19:10:49+5:30

Bhandara News मोहाडी व पवनी तालुक्यातील अनेक भागात शनिवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी परिसरात गारपीटीने झोडपून काढले.

Bhandara district lashed by stormy rain with hail; Vegetable and summer paddy crops are in trouble | भंडारा जिल्ह्याला  गारांसह वादळी पावसाचा तडाखा; भाजीपाला व उन्हाळी धान पीक अडचणीत

भंडारा जिल्ह्याला  गारांसह वादळी पावसाचा तडाखा; भाजीपाला व उन्हाळी धान पीक अडचणीत

googlenewsNext

भंडारा : मोहाडी व पवनी तालुक्यातील अनेक भागात शनिवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी परिसरात गारपीटीने झोडपून काढले. यामुळे शेतशिवारातील उन्हाळी धान पीक जमिनीवर लोळले. तसेच भाजीपाला पिकाची हानी झाली.


शनिवारला अचानक मोहाडी व पवनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तर काही ठिकाणी गारपिट झाली. यामुळे शहरांसह ग्रामीण भागात एकच धावपळ उडाली. यामुळे शेतशिवारात कापून ठेवलेल्या उन्हाळी धानाच्या कळपा पाण्यात भिजल्या. त्यामुळे पाखर धान होण्याची शक्यता आहे. उभे धान जमिनीवर लोळल्याने कापणीचा खर्च वाढणार आहे. उन्हाळी मूंग व उळीद व अन्य भाजीपाला पीक यांचेही गारपिटीने नुकसान झाले.

Web Title: Bhandara district lashed by stormy rain with hail; Vegetable and summer paddy crops are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती