भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:08 AM2019-04-13T11:08:15+5:302019-04-13T11:11:09+5:30

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.

In Bhandara district, shepherds search for fodder | भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

भंडारा जिल्ह्यात मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मानवासोबतच जिल्ह्यातील पशुंनाही बसत आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांचा फटका शेळ्या,मेंढ्या,दूघ उत्पादकांना बसू लागला आहे.गुरांसह, बकऱ्यांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात मेंढपाळांची ससेहोलपट होत असून जास्त प्रमाणात बकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन,मेंढपालनावर चालतात.ग्रामीण भागात चरीतार्थाचे साधन म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत.परंतु मुख्यालयी असणारे पयुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाºयांनी उप स्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पाणीटंचाईमुळे ईतर जिल्ह्यातील देखील मेंढपाळांचे कळप चाऱ्याच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. यामध्ये अन्य जिल्ह्यातील मेंढपाळ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा हे मेंढराचे कळप पुन्हा आपल्या जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली की परत जात असतात.
जिल्ह्यात सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात हे कळप चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बीची पीके काढली आहेत. त्यामुळे शेतशिवारे रिकामे झाल्यामुळे मेंढपाळांना चारा काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत अ सल्याने जेथे पाण्याची सोय आहे त्याच भागात हे कळप स्थिरावत आहेत.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी बकऱ्यांना पिण्याचे पाणी व चरण्यासाठी झाडपाला मिळत नसून मेंढपाळांना स्वत:च्या आरोग्यासह आपल्या जितराबांचा प्रश्न सतावतो आहे. मेंढपाळांसोबत स्वत:चे कुटुंब असल्याने चिमुकल्या मुलांचे आरोग्यही बिघडत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून दुर्लक्षीत असणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

उष्माघाताचा पशुधनाला बसतोय फटका
उन्हाच्या वाढलेल्या काहीलीमुळे जिल्ह्यातील पशुधनाला फटका बसत असून वाढत्या तापमानामुळे अनेक पशुपालक धास्तावलेले आहेत.गाई,म्हशी, शेळ्या ,मेंढ्यासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून काही ठिकाणी बकºया उष्माघाताच्या बळी ठरत आहेत. शेतीचा पोत वाढवण्यासाठी शेतात बसवलेल्या मेंढ्यांना चारापाण्याच्या शोधार्थ राणावणातच भटकावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने पशूंना वळेवर उपचार मिळत नसल्याने बकºयांसह, मेंढ्यांना याचा फटका बसत आहे.

Web Title: In Bhandara district, shepherds search for fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न