भंडारा निवडणूक निकाल; भाजपचे झाले पानिपत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 08:48 PM2019-10-24T20:48:17+5:302019-10-24T20:48:44+5:30

Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Bhandara Election Results 2019; साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले या महाआघाडीच्या उमेदवारांसोबत भंडारा अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी विजयाचा झेंडा रोवला.

Bhandara election results; Nana Patole Vs Dr. Parinay Fuke, Pradip Padole Vs Raju Karmore | भंडारा निवडणूक निकाल; भाजपचे झाले पानिपत

भंडारा निवडणूक निकाल; भाजपचे झाले पानिपत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली मतदारसंघात भाजपचे पानिपत झाले. बंडखोरांनी भाजपचा घात केला. साकोली मतदारसंघात भाजपचे परिणय फुके यांनी सुरूवातील आघाडी घेतली. मात्र, नंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर मात करीत विजय मिळविला. भंडारा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने तिनही आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र जनतेने त्यांना कौल नाकारला.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील तीनही जागांवर ताबा मिळविण्यात महाआघाडी आणि अपक्षाला यश आले आहे. तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले या महाआघाडीच्या उमेदवारांसोबत भंडारा अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी विजयाचा झेंडा रोवला.
साकोली मतदारसंघाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले होते. कोण विजयी होणार याची सर्वांना उत्सुकता होती. सुरूवातीच्या फेºयात भाजपचे डॉ. परिणय फुके आघाडीवर होते. मात्र नंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत. हेवीवेट लढतीत येथे काँग्रेसने विजय संपादित केला. तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आणि भाजप बंडखोर अपक्ष चरण वाघमारे यांच्यातच खरी लढत झाली. भाजपचे प्रदीप पडोळे तिसºया क्रमांकावर गेले. विशेष म्हणजे चरण वाघमारे यांची तिकीट नाकारून भाजपने नगराध्यक्ष पडोळे यांना रिंगणात उतरविले होते. येथे राष्ट्रवादीचे कारेमोरे यांनी विजयी मिळविला. भंडारा मतदारसंघात अपक्ष नरेंद्र भोंंडेकर यांनी विजयी संपादित करून इतिहास रचला. आजपर्यंत या मतदारसंघात कोणताही अपक्ष उमेदवार विजयी झाला नव्हता. भोंडेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून त्यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र महायुती आणि महाआघाडीने आपल्या घटक पक्षाला ही जागा सोडल्याने भोंडेकरांनी बंडखोरी केली. त्यांना मतदारांनी पसंती देत अपक्ष आमदार विधानसभेत पाठविले. जिल्ह्यात उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Bhandara election results; Nana Patole Vs Dr. Parinay Fuke, Pradip Padole Vs Raju Karmore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.