ऊर्जामंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 02:01 PM2019-02-22T14:01:29+5:302019-02-22T14:01:34+5:30

शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

Bhandara : Former BJP corporator's attempted to suicide at the rally of the Minister of Energy Chandrashekhar Bawankule | ऊर्जामंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

ऊर्जामंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

Next

भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा शहर पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन आणि कामगार कल्याण विभागाचा लाभ वाटप सोहळा दशहरा मैदानात शुक्रवारी (22 फेब्रुवारी) आयोजित होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सोहळा सुरू असताना भाजपाचे माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे अचानक मंचावर आले. पालकमंत्र्यांच्या समक्ष अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी त्याला पकडून व्यासपीठावरुन खाली आणले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. 
मिळालेल्या माहितीनुसार,  आठ दिवसापूर्वीच अरुण भेदेनं प्रशासनाला निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता. या घटनेने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

Web Title: Bhandara : Former BJP corporator's attempted to suicide at the rally of the Minister of Energy Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.