Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : दुसऱ्या फेरीनंतरही सुनील मेंढे यांची आघाडी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: June 4, 2024 12:04 PM2024-06-04T12:04:25+5:302024-06-04T12:06:33+5:30
Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे 3,096 मतांची आघाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : मतमोजणीची दुसरी फेरी जाहीर झाली असून या फेरीतही भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे 3,096 मतांची आघाडी घेतली आहे. सुनील मेंढे यांना 48,385 मते मिळाली असून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना 43,289 मते मिळाली आहे.
रिंगणामध्ये 18 उमेदवार असले तरी भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातच दिसत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसरी फेरी जाहीर केली असली तरी प्रोग्रेसिव्ह फेऱ्यांमध्ये देखील सध्या तरी सुनील मेंढे हेच आघाडीवर दिसत आहेत. पहिल्या फेरीमध्ये सुनील मेंढे 1,090 मतांनी आघाडीवर होते. मेंढे यांना 22,990 तर प्रशांत पडोळे यांना 21,900 मते होती. सध्याची स्थिती पाहता तिसऱ्या स्थानावर संजय कुंभारकर हे आहेत. या फेरी अखेर त्यांना 1,788 मते मिळाली आहेत.
या लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात १८ उमेदवार होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत येथे बसपाचे संजय कुंभलकर, वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार सेवक वाधाये यांची उमेदवारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती. यात सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते, तर नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८५९ मते मिळाली होती. यात भाजपचे सुनील मेंढे हे १ लाख ९७ हजार ३९४ मतांनी विजयी झाले होते. तर बसपाच्या विजया नंदूरकर या ५२ हजार ६५९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होत्या, वंचितचे उमेदवार नान्हे यांना ४५ हजार ८४२ मते मिळाली होती. तर 'नोटा'ला १० हजार ५२४ मते मिळाली होती.