भंडारा पंचायत समिती वाऱ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:06 AM2017-12-21T00:06:20+5:302017-12-21T00:07:13+5:30
देवानंद नंदेश्वर।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली. मात्र एखाद्या शसाकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आली.
भंडारा पंचायत समितीतील कार्यालयाचा कारभार कसा चालतो, याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सदर प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाचा फेरफटका मारला असता. बहुतेक कर्मचारी टेबलवरुन बेपत्ता असल्याचे दिसून आले. या पंचायत समितीअंतर्गत एकूण ९४ ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावातील नागरिक आपली कामे घेऊन येथे येतात. परंतु कर्मचारी कामावर उपस्थित असून सुद्धा ते आपल्या टेबलवर दिसत नाहीत. दिवसभर प्रतीक्षा करूनही त्यांना काम न होता निघून जावे लागते. पंचायत समिती अंतर्गत बांधकाम, आरोग्य, कृषी, शिक्षण यासारखे विभाग आहेत. ग्रामीण भागातून येणाºया नागरिकाला अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
सदर प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाचा दुपारी १ वाजताच्या सुमारास फेरफटका मारला असता सभापती व उपसभापती कक्ष रिकामे होते. सभापती प्रल्हाद भुरे व उपसभापती ललीत बोंद्रे हे पशुप्रदर्शनीला गेल्याचे सांगण्यात आले. गटविकास अधिकारी कक्षात पाहणी केली असता गटविकास अधिकारी अधिकारी खुर्चीवर दिसून आले नाही. शिक्षण विभाग कक्षात तीन महिला कर्मचारी उपस्थित होत्या. लेखा विभागात दोन पुरुष कर्मचाºयांची उपस्थिती होती. सहायक गटविकास अधिकारी कक्षातील खुर्ची अधिकाºयाविना रिकामी होती. पशुसंवर्धन विभागाचे कक्ष कुलूपबंद होते. बांधकाम विभाग कक्षात दोन अभियंते हजर होते. आस्थापना विभागात सर्वाधिक अधिकारी व कर्मचाºयांची ९९ टक्के हजेरी दिसून आली. कृषी विभाग कक्ष व सांख्यिकी विभागात प्रत्येकी दोन कर्मचारी उपस्थित होते. याबाबत उपस्थित अधिकाºयाला विचारले असता, अनेक कर्मचारी बाहेर काम आहे, असे सांगून निघून जातात. वरिष्ठ अधिकारी कुणाकुणाकडे लक्ष देणार, ज्यांचे त्यांना कळाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
खंडविकास अधिकारीपद प्रभारीवर
भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नुतन सावंत या प्रसुती रजेवर गेल्यामुळे त्यांचा प्रभार सत्येंद्र तामगाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रभार असताना त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील असतात, असेही चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयाला दांडी
पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे प्रभाग म्हणजे कृषी, पंचायत, बांधकाम, शिक्षण, रोजगार हमी, बालविकास प्रकल्प, आरोग्य असे महत्त्वाचे प्रभाग आहे. या प्रभागातील अधिकारी ग्रामीण भागाच्या जनजागृतीसाठी दौरे काढतात. त्याचाच फायदा घेऊन कर्मचारी कार्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसून आले आहे.
मानेगाव (बाजार) येथे आयोजित पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात उपस्थितीमुळे दुपारच्या सुमारास कार्यालयात नव्हतो. पंचायत समितीतील बरेच अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून रमाई आवास योजनेची तपासणीसाठी तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी गेले आहे. ग्रामस्थांना अडचण निर्माण होऊ नये, त्यासाठी व्यवस्था केली आहे.
-सत्येंद्र तामगाडगे, गटविकास अधिकारी, पं.स.भंडारा.
पंचायत समितीत अनेकदा अधिकारी-कर्मचारी खुर्चीवर उपस्थित राहत नसल्यामुळे कामाचा खोळंबा होतो. ग्रामीण भागातील नागरीकांना त्रास होऊ नये म्हणून यापुर्वी अनेकदा अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
-टेकराम पडोळे, सदस्य, पंचायत समिती, भंडारा