भंडारावासीयांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:08 AM2019-08-25T01:08:40+5:302019-08-25T01:09:08+5:30

येथील १०० खाटांचे महिला रुग्णालय ६१ कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात येणार आहे. याठिकाणी अत्याधुनिक सेवा उपलब्ध राहणार आहे. इमारत संपूर्ण हरित व सौर उर्जेवर केली जाईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग व वायफाय हे वैशिष्ट राहणार आहे.

Bhandara residents will get state-of-the-art health care | भंडारावासीयांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार

भंडारावासीयांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार

Next
ठळक मुद्देपरिणय फुके । महिला रुग्णालयाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील १०० खाटांचे महिला रुग्णालय ६१ कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात येणार आहे. याठिकाणी अत्याधुनिक सेवा उपलब्ध राहणार आहे. इमारत संपूर्ण हरित व सौर उर्जेवर केली जाईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग व वायफाय हे वैशिष्ट राहणार आहे. दोन टप्प्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असून दोन वर्षात लोकांच्या सेवेत रूजू होईल. त्यामुळे भंडारावासीयांना अत्याधुनिक आरोग्य सेवा भंडारातच उपलब्ध होतील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली.
भंडारा येथील महिला रुग्णालयाच्या इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा.सुनील मेंढे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार राजेश काशीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, कार्यकारी अभियंता दिनेश नंदनवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन चव्हाण उपस्थित होते. पालकमंत्री डॉ.फुके म्हणाले, भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा खरा विकास केला जाणार असून नवेगाव, नागझिरा पर्यटन विकासासाठी कटीबद्ध आहोत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होम स्टे योजना आखली आहे. त्यासाठी एका कंपनीशी करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ता दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपये मंजूर केले असून तुमसर येथे स्टील प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले. उमेरड-कºहांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासासाठी २०० कोटींची योजना तयार केल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी केले.
पालकमंत्र्यांनी चालविली रुग्णवाहिका
अड्याळ उपजिल्हा रुग्णालयाला खनीज विकास निधीतून रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वत: रुग्णवाहिका चालवून आगळेवेगळे लोकार्पण केले. त्यांनी कार्यक्रम स्थळ ते सामान्य रुग्णालयापर्यंत ही रुग्णवाहिका चालवत नेली.

Web Title: Bhandara residents will get state-of-the-art health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.