Bhandara: ढग काळेकुट्ट, पण पाऊस रिमझिम; भंडारा जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रोवणी, शेतकरी संकटात

By युवराज गोमास | Published: July 11, 2024 02:55 PM2024-07-11T14:55:24+5:302024-07-11T14:55:48+5:30

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात यंदा १,८९,१५५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे. त्यातही सर्वाधिक १,७२, ६३८ हेक्टरवर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. परंतु, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

Bhandara: The clouds are dark, but the rain is drizzling; In Bhandara district only 6 percent planting, farmers in crisis | Bhandara: ढग काळेकुट्ट, पण पाऊस रिमझिम; भंडारा जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रोवणी, शेतकरी संकटात

Bhandara: ढग काळेकुट्ट, पण पाऊस रिमझिम; भंडारा जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रोवणी, शेतकरी संकटात

- युवराज गोमासे
भंडारा : जिल्ह्यात यंदा १,८९,१५५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे. त्यातही सर्वाधिक १,७२, ६३८ हेक्टरवर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. परंतु, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. १ ते १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ३८२.६ मिमी पाऊस होणे अपेक्षीत असताना १५६.६ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे २३१ मिमी पावसाची तूट आहे. परिणामी जिल्ह्यात केवळ ६ टक्के रोवणी आटोपली आहे. आकाशात विजांच्या कडकडाटासह काळेकुट्ट ढग तयार होत असताना रिमझीम पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकरी देवा आतातरी जोरकस पाऊस बरसू दे, अशीची भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यात १० जुलैपर्यंत भात नर्सरी १७,८६० हेक्टर, आवत्या धान २२८७ हेक्टर, भात रोवणी ८५१० हेक्टर क्षेत्रावर झाली असून एकूण १०७९७ हेक्टरवर आतापर्यंत भात पिकाची लागवड आटोपली आहे. भात लागवडीची टक्केवारी ६ आहे. जिल्ह्यात मका पिकाचे लागवड क्षेत्र सातत्याने वाढत आहे. गत वर्षी ४० हेक्टरवर झालेली लागवड यंदा ७० हेक्टरवर होणार आहे. परंतु, आतापर्यंत केवळ १३ हेक्टरवर लागवड आटोपली आहे. गतवर्षी तूर पिकाची ९४४५ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ११४०० हेक्टरवर लागवडीचे नियोजन असताना ४८८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी ९८८ हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा ११४० हेक्टर पेरणी होणार असताना ७४९ हेक्टर झाली आहे.

जिल्ह्यात खरिपात भाजीपाला लागवडीचे क्षेत्र कमी आहे. गतवर्षी १००४ हेक्टर तर यंदा १२०० हेक्टर भाजीपाला लागवड होणार असताना आतापर्यंत ५३७ हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी ७९० हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी झाली होती. यंदा ८२० हेक्टरवर लागवडीचे नियोजन असताना ५८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी २२०५ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. यंदा २३०० हेक्टरवर लागवड होणार असताना ११८९ हेक्टरवर लागवड झाली आहे.

धान लागवड झालेले क्षेत्र (हे.), टक्केवारी

तालुका  एकूण क्षेत्र  झालेली लागवड   टक्केवारी

भंडारा   २४६६३            ७४७             ०३
मोहाडी  २७४५४           ९५६             ०३

तुमसर    २७८९५          ४३६            ०२
पवनी      २८९६२          ४७३१           १८

साकोली  १७५४८           ९२१            ०५
लाखनी    २२२०६          १३४२           ०८

लाखांदूर   २५८०७         १६६४          ०६
एकूण       १७२६३८       १०७९७        ०६

पवनी तालुका सर्वाधिक, तुमसर माघारले
जिल्ह्यात पाऊस रखडल्याने सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी रखडली आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांनी अद्यापही रोवणीस सुरूवात केलेली नाही. १० जुलैपर्यंत पवनी तालुक्यात सर्वाधिक १८ टक्के रोवणी आटोपली असून तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. तुमसर तालुका यंदा माघारला असून केवळ २ टक्के राेवणी आटोपली आहे.

 

१० जुलैपर्यंत बरसणारा पाऊस, झालेला पाऊस (मिमी)

तालुका    होणारा पाऊस     झालेला पाऊस

भंडारा        ३८९.७            १०२.९
मोहाडी      ३४७.९             १४५.१

तुमसर       ३६५.१             १७१.४
पवनी         ३६०.९             १९५.२

साकोली     ४१५.६             १२१.८
लाखांदूर     ३९६.६             २१४.८

लाखनी       ३९१.२              ९८.६
भंडारा एकूण ३८२.६           १५१.६

Web Title: Bhandara: The clouds are dark, but the rain is drizzling; In Bhandara district only 6 percent planting, farmers in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.