स्वेच्छा रक्तदानासाठी सरसावले भंडारावासी

By admin | Published: July 3, 2017 12:42 AM2017-07-03T00:42:29+5:302017-07-03T00:42:29+5:30

‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त..

Bhandara, who volunteered for voluntary blood donation | स्वेच्छा रक्तदानासाठी सरसावले भंडारावासी

स्वेच्छा रक्तदानासाठी सरसावले भंडारावासी

Next

निमित्त बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लाईफलाईन ब्लड बँक नागपूरचे आर.एम.ओ. डॉ.अविनाश बाभरे, अतिथी म्हणून श्री गणेश हायस्कूलचे सचिव पद्माकर मोघे, मुख्याध्यापक सारंग महांकाळ, मनोज साठवणे, गीता साठवणे, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर परसावार व पहिले रक्तदाता विजय गजभिये उपस्थित होते.
या रक्तदान अभियानात सहभागी रक्तदात्यांना रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विजय गजभिये, सूरज माकडे, अनिल मदारकर, नरेंद्र सेवक, अरुण कावळे, खेमचंद सोनवाने, आलोक बोरकर, सौरभ लोणारे, डॉ. योगेश धुर्वे, किरण जंजाळ, सौरभ ठवकर, शरद गजभिये, फरहान पठाण, तुळशीदास कुंभारे, मोहन बोटकवार, प्रेरणा सिंगनजुडे, श्रीकृष्ण उके, अभिजित ठाकुर, प्रदिप घाडगे आदींनी स्वच्छेने रक्तदान केले.
कार्यक्रमाचे संचालन व नियोजन बालविकास मंचचे संयोजक ललित घाटबांधे यांनी तर आभारप्रदर्शन सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले. कार्यक्रमासाठी लाईफलाईन ब्लड बँकचे अमृता साहू, चैताली खंडाळे, डिम्पल खोब्रागडे, नविस्ता अमरिन, आयशा सिद्धीकी, शामसाहू प्रविण पायघन, युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे, धनश्री खोत यांनी सहकार्य केले.

अंध व्यक्तीचे डोळस रक्तदान
बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर असल्याचे कळताच लाखनी येथून नरेंद्र सेवक नामक हा व्यक्ती रक्तदान करण्यासाठी श्री गणेश हायस्कूल येथे आले होते. ते दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही रक्तदान करणार असल्याचे सांगताच सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु मी येथे रक्तदान करण्यासाठीच आलेलो असून यापूर्वी अन्य ठिकाणी चारवेळा रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, रक्तदान हे सामाजिक ऋण फेडण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. माझ्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर यापेक्षा मोठे पुण्य कोणते असू शकते. मी अंध असून रक्तदान करू शकतो तर डोळसांनीही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. रक्तदान ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून रक्तदान ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Bhandara, who volunteered for voluntary blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.