भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:47 PM2019-02-25T22:47:17+5:302019-02-25T22:47:28+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून भंडाराचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली आहे.
अरविंद साळवे यांनी यापूर्वी अमरावती ग्रामीणचे उपपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे. तर भंडाराच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू आता गोंदियाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होत आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून भंडारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात भंडारा पोलिसांचे नाव राज्य पातळीवर पोहचविले.
पोलीस ठाणे आपल्या दारी या उपक्रमाचे राज्यस्तरावर कौतुक झाले होते. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीवरही त्यांनी अंकुश निर्माण केला होता. लवकरच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आयपीएस आपला पदभार स्विकारतील असे सांगण्यात आले.