भंडाऱ्याचा युवक खेळणार प्रो कबड्डीत; बंगाल वॉरियर्समध्ये सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 08:37 PM2021-09-01T20:37:08+5:302021-09-01T20:37:32+5:30

Bhandara News बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Bhandara's youth to play pro kabaddi; Participation in Bengal Warriors | भंडाऱ्याचा युवक खेळणार प्रो कबड्डीत; बंगाल वॉरियर्समध्ये सहभाग

भंडाऱ्याचा युवक खेळणार प्रो कबड्डीत; बंगाल वॉरियर्समध्ये सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देमातीच्या कोर्टात खेळणाऱ्या 'आकाश'ची प्रो-कबड्डीत गरुडझेप

राजू बांते

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा - बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. खेळ हा त्याचा अविभाज्य अंग बनला होता. मातीच्या मैदानात खेळणारा आकाश एक दिवस नक्की नाव कमावणार, यावर विश्वास ठेवणाऱ्या पित्याचे स्वप्न आज खरे ठरले आहे. (Bhandara's youth to play pro kabaddi; Participation in Bengal Warriors)

मोहाडीचा आकाश पिकलमुंडे प्रो-कबड्डीसाठी निवडला गेला. २०२१ प्रो-कबड्डीच्या हंगामात प्रथमच आकाशची एंट्री झाली. बंगाल वाॅरियर्सने त्याला १७ लाखांत विकत घेतले आहे. त्याच्या निवडीची बातमी मोहाडीत धडकताच कबड्डीप्रेमींनी आनंद व्यक्त केला. आकाश यांचे पालडोंगरी हे छोटासा गाव. त्यांचे वडील नत्थू पिकलमुंडे वीज वितरण कंपनीत नोकरीवर आहेत.

वयाच्या सात वर्षांपासून आकाश जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथे असलेल्या कबड्डीच्या कोर्टावर आला. कबड्डी खेळाचा वारसा पित्याकडून मिळाला. आकाशचे वडील कबड्डी खेळाचे चांगले रेडर होते. आकाशचे कबड्डी खेळाचे प्रशिक्षक बनले होते. कबड्डीमधील बारीक-सारीक तंत्र-कौशल्ये आकाशला मिळत गेली. प्रो-कबड्डीपर्यंत येण्याची खरी ताकद निर्माण वडिलांनी मिळवून दिली. आधीपासून आकाशने फिटनेसला महत्त्व दिले. आकाशचा कबड्डीसोबत अभ्यास व खेळावर फोकस होता.

शालेय खेळात त्याने मातीच्या मैदानात आपली विशिष्ट छाप पाडली. शालेय खेळानंतर तो विद्युत मंडळाकडून खेळायचा. तसेच त्याने असोसिएशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या अनेक कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. २०१०-११ नंतर शालेय खेळात त्याने एक वेळ राष्ट्रीय, तर पाचवेळा राज्यस्तर गाजविला. नागपूर विद्यापीठातून पाच वेळा वेस्ट झोन मारून कलर कोट तर दोन वेळा औरंगाबाद विद्यापीठातून ऑल इंडिया वेस्ट झोन गाठून कबड्डी खेळात नाव कमावले. २०१२ व २०१५-१६ मध्ये एकदा सीनिअर नॅशनलपर्यंत मजल मारली. प्रो-कबड्डी सेशन सुरू झाल्यानंतर आपण एक दिवस प्रो-कबड्डीच्या मैदानात जाऊ असे बघितलेले स्वप्न आज पूर्ण केले. आता आकाश पिकलमुंडे बंगाल वाॅरियर्समध्ये खेळताना दिसणार आहे.

महावितरण विभाग, भारत पेट्रोलियम, मुंबई इथून तो याआधी खेळला आहे. तो आता एअर इंडियासोबत करारबद्ध झाला आहे. मोहाडीच्या मातीतील खेळाडूने देशपातळीवर नाव कमावल्यामुळे आकाशच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

मोठ्यांचा सन्मान करा. तरुणांनी स्वतःचे ध्येय निश्चित केले पाहिजे. निर्व्यसनी राहायला हवे. खेळात करिअर करता येते. आवड व क्षमता निर्माण करा. खेळात सातत्य राखा, प्रचंड मेहनत करायला शिका. यश तुमच्या जवळ येईल.

आकाश पिकलमुंडे

प्रो-कबड्डी खेळाडू, मोहाडी

Web Title: Bhandara's youth to play pro kabaddi; Participation in Bengal Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी