भंडारा येथे ‘बीआरएसपी’चे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:14 PM2018-10-05T22:14:39+5:302018-10-05T22:15:12+5:30
इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनात दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनात दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारला सकाळी ११ वाजतापासून धरणेला प्रारंभ झाला. यावेळी विदर्भ प्रदेश महासचिव झेड. आर दुधकुवर, महासचिव श्रावण एम भानारकर, जिल्हा प्रभारी डॉ. महेंद्र गणवीर, मनोज बन्सोड, सुरेश मोटघरे, कन्हैया शामकुवर, महेश मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले. त्यांनी दिवसेंदिवस डिझेल पेट्रोल, सिलिंडर गॅसची दरवाढ देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या घाईत नेऊन टाकणारी आहे. या दरवाढीसोबतच टोलनाक्यावर ट्रान्सपोर्टींग करणाऱ्या वाहनांकडून होत असलेली वसुली देशात महागाईला वाढीस लावणारी आहे. जनतेच्या श्रमातून होणाऱ्या धनाची मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. याला भाजपचे सरकार कारणीभूत आहेत. येत्या काळात भारतीय जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा सज्जड दम यावेळी देण्यात आला. उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासन विरोधी घोषणा केली. शासनाने आंदोलनाची त्वरित दखल घेवून इंधन दरवाढीत २० ते २५ रुपयांनी घसरण करावी, टोलनाक्यावरील वसुलीमध्ये योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. निवेदनाच्या प्रती पेट्रोलियम मंत्री व महाराष्टÑाचे मुख्यमंत्री यांना पाठविले. आंदोलनात शैलेश जांभुळकर, प्रेमानंद गोस्वामी, गौतम रामटेके, अमित जनबंधू, राष्टÑपाल हुमने, गौतम रामटेके, विनोद उके, प्रल्हाद रामटेके, हरिश्चंद्र ठाकरे, धम्मदीप साखरे, आदीनाथ गेडाम, एम. टी. रामटेके, अंकित सहारे यांच्यासह बीआरएसपीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.