भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस
By Admin | Published: April 18, 2017 12:39 AM2017-04-18T00:39:35+5:302017-04-18T00:39:35+5:30
पं. दिनदयालजी उपाध्याय जन्मशताब्दी वर्षात भारतीय जनता पार्टीचा ३७ वा स्थापना दिवस भिलेवाडा (भंडारा) येथील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात साजरा केला.
‘भीम अॅप’ची दिली माहिती : शेकडो उपस्थितांना मार्गदर्शन
भंडारा : पं. दिनदयालजी उपाध्याय जन्मशताब्दी वर्षात भारतीय जनता पार्टीचा ३७ वा स्थापना दिवस भिलेवाडा (भंडारा) येथील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले, उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश हे होते, तर उद्घाटक डॉ. उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री विदर्भ विभाग होते. मुख्य अतिथी आमदार चरण वाघमारे, आमदार राजेश काशीवार, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार डॉ. परिणय फुके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाअध्यक्ष मो. तारीक कुरैशी यांनी केले.
व्यासपिठावर कार्यकारिणी सदस्य माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. प्रकाश मालगावे, धनंजय मोहकर, डॉ. युवराज जमईवार, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, प्रदिप पडोळे, मुकेश थानथराटे, भरत खंडाईत, भाजपा शिक्षक सेलचे विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, साकोली नगराध्यक्ष धनवंता राऊत, लाखांदूर नगराध्यक्ष निलीमा हुमने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता ब्राम्हणकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, नितीन कडव, भंडारा नगर परिषद उपाध्यक्ष रुबी चड्डा, तुमसर नगर परिषद उपाध्यक्ष कांचन कोडवानी आदी उपस्थित होते. याप्रसंगी पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.प्रकाश मालगावे यांनी तर नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या भिम अॅप संबंधी अंगेश बेहलपाडे यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)