‘मे’ हीटच्या तडाख्याने भंडारावासी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:09 PM2018-05-19T23:09:42+5:302018-05-19T23:10:05+5:30
यंदाचा उन्हाळा भंडारेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, भंडाराचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाºया उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यंदाचा उन्हाळा भंडारेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, भंडाराचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाºया उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे महावितरणनेही विजेचा लंपडाव केल्याने भंडारेकर हैराण झाले आहेत.
यंदा हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा तीव्र असून, दिवसेंदिवस तापणाºया उन्हांमुळे शहरामध्ये राहणे अनेकांना नकोसे झाले आहे. पाºयाने शुक्रवारला ४५.५ अंश तापमान गाठले होते. अजून मे महिन्यातील दोन आठवडे शिल्लक आहे. त्यामुळे अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार आहे. जबरदस्त उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
नवतपा २५ मे पासून
भंडारा-गोंदिया पोटनिवडणुक प्रचाराला वेग आला असला तरी प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास हा वेग मंदावल्याचे दिसून येते. २५ मे पासून नवतपाला सुरूवात होणार आहे. मात्र राजकीय आखाड्यात चार दिवसापुर्वीपासूनच नवतपाला प्रारंभ झालेला आहे. नवतपामध्ये असणारी उष्णतेची दाहकता शनिवारला दिसून आली. घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कूलरने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना ! यावर्षी मार्चपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या. मे महिन्यात असह्य केलेल्या उन्हाच्या झळा बसत आहे. अगदी सकाळपासूनच उकाडा वाढू लागला. दुपारी दोनच्या सुमारास तर भट्टीजवळून चालतोय की काय? असा अनुभव येत आहे. शनिवारला यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस ४३ अंश तापमान नोंदविण्यात आले. अंगाची लाहीलाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत ऊष्ण वारे वाहत आहेत.