भंडाराचा चेतन ‘आयआयटीत’
By Admin | Published: July 10, 2017 12:15 AM2017-07-10T00:15:35+5:302017-07-10T00:15:35+5:30
मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही.अशाच प्रकार भंडारा (भोजापूर) येथील रहिवासी असलेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही.अशाच प्रकार भंडारा (भोजापूर) येथील रहिवासी असलेला चेतन पद्माकर देशमुख या विद्यार्थ्याने खरगपूर येथील इंडियन इन्स्टीटयूट आॅफ टेक्नॉलॉजी मध्ये (आयआयटी) प्रवेश घेवून भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
खरबी येथील विकास विज्ञान महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर चेतनने आपली महत्वाकांक्षा आयआयटी खरगपूर येथे जाण्याची पूर्ण केली. त्याला मेटॉलॉजीकल अॅण्ड मटेरियल्स इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला आहे. याला जेईई मेन्समध्ये १८७ गुण व अॅडव्हॉन्स मध्ये १७९ गुण प्राप्त केले. त्याला इयत्ता बारावीमध्ये ८९ टक्के गुण मिळाले आहेत.
या यशासाठी त्याला आई-वडील, काका, शिक्षकवृंद व विकास विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्यांसह संचालकांचे मार्गदर्शन लाभले.