भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:17 PM2018-03-25T23:17:08+5:302018-03-25T23:17:08+5:30

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली.

Bhimalkasa project will fulfill the dream of the Green Revolution | भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : तब्बल ४५ वर्षानंतर झाले भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन, तर १०७१ हेक्टर शेतीत सिंचनाचा लाभ

आॅनलाईन लोकमत
साकोली : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम करण्यास त्यांची मानसिकताच नव्हती. मात्र आ. बाळा काशिवार यांनी सातत्याने सतत प्रयत्न करुन हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे एक हजार ७१ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार असून परिसरात हरितक्रांती घडणार आहे, असे मत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
साकोली तालुक्यातील वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. बाळा काशिवार, सभापती रेखा वासनिक, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सभापती उषाताई डोंगरवार, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, मंदा गणवीर, उपसभापती वर्षा कापगते, सरपंच भिमावती पटले, सरपंच ज्योती वघारे, उपसरपंच धर्मराज भलावी, माजी सरपंच जयनाथ रहांगडाले, चुन्नीलाल वासनिक, माजी सभापती गिताताई कापगते, दादा टिचकुले, प्रकाश बाळबुध्दे, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे या प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी चोपडे उपस्थित होते.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले की, भिमलकसा प्रकल्पाचे कामाला १९७२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र वनकायद्याच्या अडचणीमुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला. तेव्हापासून या प्रकल्पाकडे कुणीही लक्ष दिले नाही. तेव्हाच या प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले असते. शासनाचा निधीही कामी लागला असता व या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग शतीकरिता झाला असता.
यावर्षी उीपीडीसी अंतर्गत भंडारा जिल्ह्याला १४० कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. पुढच्यावर्षी १७५ कोटी रुपयाची मागणी आपण करणार असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हा निधी वापरण्यात येणारआहे.
याशिवाय यावर्षीपासून शासनाच्या नविन योजनांना सुरुवात होणार आहे. यात ज्याची घरे ५०० फुट जागेत बांधली आहेत त्यांना शासनातर्फे मोफत पट्टे देणार आहे. ज्या जमिनी वर्ग २ मधून १ मध्ये आणावयाची आहेत. त्यांना कुठल्याही कागदपत्राची पुर्तता करायची नाही व बांधकाम मजुरांना दरवर्षी ६० रुपये भरुन शासनाच्या १८ योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
सिंचनाला प्राधान्य : बाळा काशीवार
१९७२ पासून रखडलेल्या भिमलकसा प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. यापूर्वी अनेकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभुल केली. या प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण करण्याचा प्रयास असुन या प्रकल्पावरुन सात गावातील एक हजार ७१ हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे. फडणवीस सरकारचे सिंचनावर अधिक भर दिला आहे. यात शेततळे, प्रकल्प, यासारख्या विविध उपक्रमाचा समावेश आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी.
नाना पटोलेंना लगावला टोला
ना.बावनकुळे यांनी वडेगाव येथे सभा सुरु होती. या सभेदरम्यान ना. बावनकुळे म्हणाले की, निवडणुका या पाच वर्षाकरिता असतात. मात्र काही जन काहीच काम करीत नाही. काम करण्याची त्याची प्रबळ इच्छा नसते. मात्र एक दुसºयावर आरोप प्रत्यारोप करुन कामे न करताच राजीनामे देतात. राजीनामा दयायचाच होता तर निवडणूक कशाला लढवितात व जनतेची दिशाभूल कशी काय करतात,असा टोलाही अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांना लावला.
वडेगावसाठी २५ लक्ष
भिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी आयोजित सभेत ना. बावनकुळे यांनी वडेगावतील विकास कामाकरिता २५ लक्ष रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यात रस्ते, लाईट यासह विविध कामाचा समावेश करण्यात येणार आहे.
लोकांची गर्दी
बहुप्रतिष्ठित भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन होणार म्हणून परिसरातील लोकांत एकच उत्सुकता होती. हा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर गावात सभा झाली. त्यावेळीही लोकांची गर्दी होती. या कार्यक्रमाला नितीन खेडीकर, किशोर पोगडे, बंडू शेंडे, चंद्रकात वडीचार, नगरसेवक सुभाष बागडे, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, भगवान पटले, आनंद सोनवाने, अमोल हलमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संचालन गिता कापगते यांनी तर आभार लखन बर्वे यांनी केले.

Web Title: Bhimalkasa project will fulfill the dream of the Green Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.