लाखनी शहरात पाच कोटींच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:40 AM2021-08-13T04:40:06+5:302021-08-13T04:40:06+5:30
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, पालकमंत्री विश्वजित कदम, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बन्सोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ...
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, पालकमंत्री विश्वजित कदम, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बन्सोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.
कुठलीही कामे अपूर्ण राहणार नाहीत, या उलट ती तातडीने होतील हाच आपला कायम प्रयत्न राहिलेला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेने प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहे. त्याच बळावर राज्यात काम करू शकतोय, साकोली मतदारसंघ जिव्हाळ्याचा विषय आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
प्रदेशाध्यक्षांनी मोठी जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिलेली आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळावा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा हाच प्रयत्न असेल, असे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
याप्रसंगी लाखनी तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, ज्येष्ठ नेते शफीभाई लद्धानी, शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, अनिल बावनकुळे, प्रदीप तितिरमारे, भोला उईके, मोहन निर्वाण, प्रशांत वाघाये, योगेश गायधने, महेश वनवे, सुनंदा धनजोडे, प्रिया खंडारे तथा सर्व अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.