कोट्यवधींचा खर्च; सिंचनासाठी व्यर्थ

By admin | Published: January 31, 2015 11:13 PM2015-01-31T23:13:12+5:302015-01-31T23:13:12+5:30

गत तीस वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत. आतापर्यंत निम्मचुलबंद प्रकल्पाचे काम जवळपास पुर्णत्वास आले असले

Billions of expenses; Waste for irrigation | कोट्यवधींचा खर्च; सिंचनासाठी व्यर्थ

कोट्यवधींचा खर्च; सिंचनासाठी व्यर्थ

Next

संजय साठवणे - साकोली
गत तीस वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत. आतापर्यंत निम्मचुलबंद प्रकल्पाचे काम जवळपास पुर्णत्वास आले असले तरी ते व्यर्थ ठरत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रकल्पाला अजुन किती दिवस लागतील, या प्रतिक्षेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा विहीरी, बोड्या व तलावाकडेच वळावे लागत आहे.
गत २० वर्षापासून तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम अपुर्ण आहे. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याच्या शेतीचा मोबदला मिळालाच नाही. प्रकल्पाच्या पंपहाऊसचे कामासह इतर काम अपूर्ण आहे. या प्रकल्पावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला असला तरी हे काम अद्यापही रखडलेले आहे. या प्रकल्पाची पाहणी तत्कालीन सिंचनमंत्री यांनी केली. मात्र हा प्रकल्प तालुका वासीयांसाठी पांढरा हत्तीच ठरला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Billions of expenses; Waste for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.