बायोडायनामिक कंपोस्ट खत प्रशिक्षण व जवस प्रात्याक्षिक
By admin | Published: February 9, 2017 12:31 AM2017-02-09T00:31:07+5:302017-02-09T00:31:07+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत चिखली या गावामध्ये शेतकरी स्वयंसहाय्यता गट यांचे माध्यमातून ...
भंडारा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत चिखली या गावामध्ये शेतकरी स्वयंसहाय्यता गट यांचे माध्यमातून बायोडायनामिक एस-१ कल्चर खत प्रशिक्षण झाला. कार्यक्रमाला आदर्श शेतकरी तानाजी गायधने व प्रमुख मार्गदर्शक विकास येळणे उपस्थित होते. जमिनीचा पोत आणि जमीनीमध्ये जीवाणुच्या संख्येत वाढ करणे व ग्राहकांना विषमुक्त अन्न पुरवठा करणे उद्देश होय.
दिवसेंदिवस लुप्त होणाऱ्या जवस पिकाचे प्रात्याक्षीक आदर्श शेतकरी गटाचे माध्यमातून २५ शेतकऱ्यांना पीके व्ही-एनएल-२१६० या जातीचे वाणाचा तसेच बीजप्रक्रिया निविदाचा (कन्सर्शिया), पीएसबी या निधीचा पुरवठा करुन आदर्श गटाने जवस पिकाची शेती फुलविली.
जवस पिकामध्ये असणारे औषधी गुणधर्म तसेच तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के ओमेगा ३. ५७ टक्के असुन या सर्व गोष्टीचा विचार करुन आणि लुप्त होत चाललेल्या जवस या तैलबियाचे प्रमाण वाढवून आणि एका नवीन पीकाकडे कळविण्याचे संदेश प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे यांनी दिले. असे ते आपले प्रास्ताविक भाषणामध्ये बोलत होते. यावेळी पिक पाहणी प्रात्याक्षिकाला उपस्थित प्रकल्प संचालक जवस (आत्मा) गोळघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा, सिध्दार्थ लोखंडे, आदर्श शेतकरी तानाजी गायधने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)