महासमाधी महास्तूप तथागत बुद्धांची जीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:34 PM2018-04-29T22:34:26+5:302018-04-29T22:34:40+5:30
पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
पवनी : पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत. महासमाधी महास्तूप म्हणजे तथागत बुद्धांची जीवनीच आहे.
पय्या मेत्ता संघद्वारा निर्मित या महास्तुपाने संपूर्ण जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेवून ठेवले आहे. धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक परिश्रमातुतनप तयार झालेला हा महास्तुप भारत जपान मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, उपासक, उपासीका मोठ्या भेट देतात या महास्तुपाच्या परिसरात मुर्तीच्या रुपात साकारण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या जीवनावरील पहील्या प्रसंगात जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भावूक झालेले घोड्यावरील राजमुमार सिध्दार्थ पाहणाऱ्याच्या मनाला भावनाविभोर करते. नंतरच्या प्रसंगात ग्यानप्राप्ती झाल्या नंतर भुकेने व्याकुळ झालेल्या भगवान बुद्धांना दानपात्रात देत असलेली सुजाता पाहतांना हा प्रसंग खरा वाटतो नंतरच्या प्रसंगता सारनाथ येथे भगवान गौतम बघ्द आपल्या पाच शिष्यांना उपदेश करीत असतांनाचा प्रसंग साकारण्यात आला आहे.
पुढे भगवान बुद्धांना ग्यान , तपस्या करतांनी साकारण्यात आलेली प्रतीमा अप्रतीम आहे. येथील भगवान बुघ्दांची वाढलेली दाढी, अस्थीर झालेले शरीर पाहून पाहणारे भावूक होतात. या मध्ये भगवान बुघ्दांच्या शरीरातील एक एक अस्थी पंजर दर्शविले आहे. नंतरच्या प्रसंगात भगवान बुघ्दांचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आले आहे.
भगवान बुघ्दांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक स्वताला धन्या णाल्याचे मानतात. महास्तुप आगळा वेगळा वैशिष्टसपूर्ण ठरता आहे. तसेच हे साकारण्यात आलेले तिकिेच अप्रतीम ठरले आहेत. भगवान बुघ्दांच्या जीवनावरील सर्व प्रसंग पाहुन पर्यटक बुघ्दांचे पंचशिलाचे तत्व आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात हे प्रसंग पर्यटकांना अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देवून जातात.