ग्रीनफ्रेंड्सतर्फे पिटेझरी येथे पक्षीनिरीक्षण व निसर्गभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:06+5:302021-06-25T04:25:06+5:30
या कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडारा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था व मानवता विकास (नेफडो)जिल्हा भंडारा ...
या कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडारा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था व मानवता विकास (नेफडो)जिल्हा भंडारा या संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ.सलीम अली यांच्या कार्याबद्दल ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी माहिती दिल्यानंतर नागझिरा अभयारण्याच्या गेट जवळून पिटेझरी रानतलावापर्यंत निसर्गभ्रमंती पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गभ्रमंती करण्यात आली. वाटेत अनेक पक्षी तसेच रानतलावाजवळ अनेक पाणपक्षी व काठावरील पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. गावाजवळील त्यांनी उभारलेल्या वन्यप्राणी तसेच पक्ष्यांकरिता उभारलेल्या निसर्गरम्य पाणवठालासुद्धा भेट देऊन जैवविविधताचे निरीक्षण करण्यात आले. दोन तासांच्या निसर्गभ्रमंती व पक्षीनिरीक्षणानंतर त्यांच्यासमवेत निसर्गगप्पा करण्यात आल्या. यावेळी ग्रीनफ्रेंड्सच्या पक्षीनिरीक्षकांनी अनेक प्रश्न तसेच पर्यावरण संवर्धनासाठी काय करता येईल याबद्दल निसर्गसंवाद केला. सर्वांनी येत्या पावसाळ्यात भरपूर फळवर्गीय झाडांचे वृक्षारोपण करण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला त्यांनी सर्वाना दिला.
कार्यक्रमात पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, अभाअंनिस व नेफडो भंडाराचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांच्यासमवेत पदाधिकारी निसर्गमित्र पंकज भिवगडे, गुणवंत जिभकाटे व योगेश वंजारी, युवराज बोबडे, छविल रामटेके, कोमल परतेकी, श्रुती गाडेगोणे, लोकेश चन्ने, लोकेश भोंगाडे, रोहित पचारे या ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिस तसेच नेफडोच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.