शास्त्री विद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:42+5:302021-09-09T04:42:42+5:30

भंडारा : भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७च्या ...

Birthday of Raje Umaji Naik at Shastri Vidyalaya | शास्त्री विद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती

शास्त्री विद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती

Next

भंडारा : भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले, अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'. स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गाकडून आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेच्या प्रचार्या केशर बोकडे यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी नामदेव साठवणे, माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे, संस्कृत विभाग प्रमुख विजयकुमार बागडकर, ज्येष्ठ शिक्षिका मेधाविनी बोडखे, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक योगिता कापगते, पांडुरंग कोळवते, सुनील खिलोटे, रेखा साठवणे, संध्या गिऱ्हेपुंजे, स्मिता गालफाडे, वर्षा बावनकर यांनी प्रतिमेस सुमने वाहून आदरांजली अपर्ण केली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Birthday of Raje Umaji Naik at Shastri Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.