आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:28+5:302021-01-15T04:29:28+5:30

पवनारा : बालपणातच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ...

Birthday of Rajmata Jijau at Ambagad fort | आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती

आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती

Next

पवनारा : बालपणातच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गड, किल्लेसंवर्धन मोहिमेअंतर्गत आंबागड किल्ल्याची स्वच्छता करून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे व युवा दिनाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे गडावर पूजन व माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शासकीय रुग्णालय, भंडारा येथे बळी गेलेल्या चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रतिष्ठानमार्फत किल्ले आंबागड येथे करण्याचे ठरविले व ते प्रत्यक्षात साध्य झाले. सर्वप्रथम किल्ल्याची स्वच्छता करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानच्या रणरागिणी, बाल व युवा मावळे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चैतन्यमय होऊन युवाशक्तीने या युवा दिवसाला साक्षी ठेवत कार्य करीत होते. गडकिल्ल्यांचे महत्त्व किती व कसे आहे, हे त्यांच्या कार्यशक्तीतून अनुभवण्यास मिळाले. स्वच्छतेनंतर लगेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, जिजाऊ गर्जना, दीपप्रज्वलन करून व मोहिमेत सहभागी झालेल्यांना प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे बालमावळे ते रणरागिणी सर्वांनी त्यांचे कार्य अतिशय उत्तमरितीने पूर्ण केले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, उपाध्यक्ष विक्की साठवणे, मनीष दुर्गे, रोशन तरटे, नवनीत चौधरी, तुषार बगले, आशिष वंजारी, निखिल पटले, लोकेश वरखेडे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. अमोल उमरकर उपस्थित होते.

Web Title: Birthday of Rajmata Jijau at Ambagad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.