आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती व किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:19+5:302021-01-14T04:29:19+5:30

पवनारा : बालपणातच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू देणार्‍या अवघ्या महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्यावतीने ...

Birthday of Rajmata Jijau and cleaning of the fort at Ambagad fort | आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती व किल्ल्याची स्वच्छता

आंबागड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांची जयंती व किल्ल्याची स्वच्छता

Next

पवनारा : बालपणातच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे बाळकडू देणार्‍या अवघ्या महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गडकिल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत आंबागड किल्ल्याची स्वच्छता करून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे व युवा दिवसाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे गडावर पूजन व माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शासकीय रुग्णालय, भंडारा येथे बळी गेलेल्या मुलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रतिष्ठानमार्फत किल्ले आंबागड येथे करण्याचे ठरविले व ते प्रत्यक्षात साध्य झाले. सर्वप्रथम किल्ल्याची स्वच्छता करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानच्या रणरागिणी, बाल व युवा मावळे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चैतन्यमय होऊन युवाशक्तीने या युवा दिवसाला साक्षी ठेवत कार्य करत होते. गडकिल्ल्यांचे महत्त्व किती व कसे आहे, हे त्यांच्या कार्यशक्तीतून अनुभवण्यास मिळाले. स्वच्छतेनंतर लगेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, जिजाऊ गर्जना, दीपप्रज्वलन करून व मोहिमेत सहभागी झालेल्यांना प्रतिष्ठानच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे बालमावळे ते रणरागिणी सर्वांनी त्यांचे कार्य अतिशय उत्तमरितीने पूर्ण केले. प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, उपाध्यक्ष विक्की साठवणे, मनीष दुर्गे, रोशन तरटे, नवनीत चौधरी, तुषार बगले, आशिष वंजारी, निखिल पटले, लोकेश वरखेडे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. अमोल उमरकर उपस्थित होते.

Web Title: Birthday of Rajmata Jijau and cleaning of the fort at Ambagad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.