लाखांदूर येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:17+5:302021-03-13T05:04:17+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य पी. एम. ठाकरे, प्रा. डॉ. भारत नखाते, प्रा. डॉ. के. वाय. ठाकरे, प्रा. डॉ. आर. ...
प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य पी. एम. ठाकरे, प्रा. डॉ. भारत नखाते, प्रा. डॉ. के. वाय. ठाकरे, प्रा. डॉ. आर. आर. राऊत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच भारताचे उप प्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण हे सर्वसामान्यांना कायम स्मरणात राहिले आहेत. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवत असताना सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी नवीन विद्यापीठ तसेच संस्था तयार करून शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणले. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्याचे व्यावसायिकरण होणे आवश्यक असून त्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण केली. तसेच भूमिहीन शेतमजुरांना भूमीचे वाटप करण्यात मोलाची भूमिका राहिलेली आहे. असे मोलाचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संचालन प्रा. डॉ. राकेश तलमले यांनी आभार प्रा. महेश ठेंगरे यांनी मानले.