गरिबांची साखर झाली कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:18 AM2017-07-25T00:18:46+5:302017-07-25T00:18:46+5:30
सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या.
साखर व रॉकेलचा कोटा कमी : ‘अच्छे दिन’ची सुरुवात?
सिराज शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सामान्य व गरीब, मजुर यांच्या लाभासाठी शासनाकडून रास्तभाव दुकानातून कमी किंमतीत गहु, तांदुळ, साखर, रॉकेल अश्या जिवनावश्यक वसतु अनेक वर्षांपासून दिल्या जात होत्या. त्या आता हळुहळु थोड्या थोड्या प्रमाणात कमी केल्या जात असुन सध्या साखर व रॉकेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ सुध्दा करण्यात आली आहे. यामुळे आता गरीब कष्टकरी जनतेच्या ताटातून गोड धोड वस्तुंचे पकवान बाद होणार आहेत. यामुळेच हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित होत आहे.
दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना शासनाच्या रास्तभाव धान्यदुकानातुन अन्न धान्याचा पुरवठा कमी किंमतीत केला जातो. पुर्वी दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या व्यक्ती ऐवजी सामानय गरीब व मजुर वर्गाना सुध्दा अल्प किंमतीत धान्य दिले जात होते ते आता साफ बंद करण्यात आले आहे. आता फक्त बीपीएल धारकांनाच धान्य दिले जाते. पुर्वी या लोकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे साखर दिली जात होती. त्यामुळे पाच व्यक्तींच्या कुटुंबाला अडीच किलो साखर मिळत होती. या साखरेचे ते दररोज चहा बनविण्यासाठी व सणासुदीमध्ये गोडधोड पकवानासाठी उपयोग करायचे. मात्र आता शासनाने साखरेच्या कोट्यात कपात केली असून प्रति कार्डधारकास फक्त एक किलो साखर देण्यात येत आहे.
एवढेच नाही तर साखरेच्या भावात सरळ ६.५० रुपयांनी वाढ सुध्दा करण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना ‘खाएंगा क्या, और खिलायेंगा क्या’ अशी परिस्थिती झाली आहे. पुर्वी साखरेचे भाव १३.५० रु. किलो होते ते आता २० रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक राशनकार्ड धारकांना मिळणारा रॉकेल सुध्दा शासनाने बंद करुन ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अश्याच लोकांना रॉकेल दिला जात आहे. पुर्वी प्रतिव्यक्त्ी एक लिटरप्रमाणे मिळणारा रॉकेलही आता कमी करण्यात आला असून जास्तीत जास्त चार लिटरपेक्षा जास्त रॉकेल देण्यात येत नाही. १२ रुपये मिळणारा रॉकेल आता २२ रुपये लिटरप्रमाणे देण्यात येत आहे.
सामान्य गरीब व्यक्तींना आवश्यक असलेल्या साखर व रॉकेल आता शासन बंद करण्याच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वसतुंच्या वाटपाच्या तयारीत असल्याचे जानवते या दोन्ही वस्तुंच्या वाटपात कात्री लावण्यात आल्याने सामान्य गरीबांना आता खुल्या बाजारातून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी भुर्दंड सोसावा लागणार आहे गॅस सिलेंडरचे भावही भरमसाठ वाढलेले आहे.
साखर व रॉकेलच्या किंमतीत वाढ
स्वस्त भाव राशन दुकानात मिळणारी १३ रुपये किंमतीची साखर आता २० रुपये प्रति किलो झाली असून प्रतिकार्उ फक्त एकच किलो दिली जात आहे. तर रॉकेलच्या किंमतीत ही भरमसाठ वाढ करुन रॉकेल आता २२ रुपये लिटर प्रमाणे दिला जात आहे. अनेकांचा रॉकेल बंद करण्यात आल्याने विद्युत गेल्यावर दिवाबत्ती कशी लावावी, चुल कसे पेटवावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. इकडे खुल्या बाजारात साखर ४४ रुपये प्रति किलो आहे तर सिलेंडरचा भाव ६५० रुपये झाला आहे.