भाजप सरकार शेतकरीविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:28 PM2018-12-25T21:28:08+5:302018-12-25T21:28:28+5:30
धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. एकंदरच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोका येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी मंचावर राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामलाल चौधरी, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, देवचंद ठाकरे, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, रूपेश खवास, सोनू खोब्रागडे, हरी खोब्रागडे, क्रिष्णा नरडंगे, उत्तम गडपाले, नितु सेलोकर, पंचायत समिती सदस्य, सुजाता फेंडर, नितीन तुमाने, अनिता तितिरमारे, काशिनाथ हातझाडे, उषा चौधरी, कोकाचे सरपंच संजय इळपाते, रविंद्र तिडके उपस्थित होते.
खासदार प्रफुल पटेल म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाचे राष्ट्रीय दर्जा काढल्याने प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मिळणारा निधी अल्प आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना व करचखेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला कमी निधी मिळाल्यामुळे पुनर्वसनाचे काम मोठया प्रमाणात रखडलेले आहे. केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकार सर्वसामान्यांसाठी हिताचे नसून उद्योगपतींचे सरकार आहे.
शेतकºयांच्या अडीअडचणी ऐकून ते सोडवण्याचे आश्वासन दिले. येत्या निवडणुकीत आघाडीची सरकार आली तर धानाला अडीच हजार रूपये दर देण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.
यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करून केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मंचावर उपस्थित अतिथींनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यात खमारी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उत्तम कळपाते यांनी क्षेत्रातील अडचणी व समस्या प्रफुल पटेल, मधुकर कुकडे यांच्यासमोर सादर केले. प्रास्ताविक हितेश सेलोकर यांनी केले. संचालन प्रदीप रंगारी यांनी तर, आभार प्रदर्शन वाल्मिक गोबाडे यांनी केले.
यावेळी ज्योत्सना मेश्राम, सरिता कोडवते, जयश्री हातझाडे, नरविर टेकाम, कमलेश मेश्राम, तुकाराम हातझाडे, सुभाष तितिरमारे, रामेश्वर राघोर्ते, शामराव उईके, प्रभू फेंडर, किशोर ठवकर, हेमलता टेकाम, अनुसया उईके, रविंद्र रामटेके, वशिष्ठ गाढवे, वासूदेव तितिरमारे, राजु लुटे, सेवक बोरकर, वसंत रेहपाडे, दिवाकर उईके, राहुल तितिरमारे, भूषण गाढवे, रवि तिडके, अतुल तिडके, श्रीराम नेवारे, गोपीचंद कुंभरे, रामचंद्र हातझाडे, सुकराम कळनायके यांच्यासह शेतकºयांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.