केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:49 PM2017-11-01T23:49:28+5:302017-11-01T23:49:48+5:30

केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे.

BJP government in central and state for capitalist interest | केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

Next
ठळक मुद्देसुरेश माने : साकोलीत विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे. सकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणे, नियोजन, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, चुकीचे नोटबंदी धोरण व शेती, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी यांना शुन्य प्राधान्य यामुळेच देशातील शेती, शेतकरी यांच्यावर अवलंबून ८५ टक्के जनता देशोधडीला लागली आहे, अशी घणाघाती टीका बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व घटनातज्ज्ञ अ‍ॅड़ डॉ. सुरेश माने यांनी साकोली येथे मंगळवारी पक्षाच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषदेत केली.
शेतकरी, शेतमजूर रोजगारी विरोधी धोरणांचा आकडेवार समाचार घेतांना अ‍ॅड.डॉ. माने म्हणाले, भारतात सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य, शेतकरी आत्महत्येत प्रथम क्रमांकाचे राज्य, विषारी किटकनाशके शेतीसाठी वापरणारे एक नंबरचे राज्य व त्यामुळे मरणारे शेतकरी यांच्यात सुध्दा पहिल्या क्रमांकाचे राज्य हे छत्रपतींचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रातील फडणवीस, सेना-भाजपा सरकारला शर्मनाक नव्हे काय असे महाराष्ट्रातील नालायक सरकार यापुढे राज्यात येणार नाही याची खबरदारी राज्यातील जनतेने घेतलीच पाहिजे अशा इशाराही त्यांनी दिला.
शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. त्यासाठी जाहिरातबाजीवर करोडो रुपये उधळले जात आहेत. सरकारी बॅकांचे लाखो करोडो शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. शेतमालाचा भाव ठरविणे व गरीब शेतकºयांना मासिक रु. ५००० पेन्शन योजना सुरु करणे यासाठी केंद्र व राज्याने कायदा करण्याची गरज आहे. तसेच शेती मालाचा भाव ठरविताना शेतकºयांचे रास्त म्हणणे सरकारने स्वीकारले पाहिजे व तसे सरकारने न ऐकल्यास राज्य घटनेच्या कलम ३२३ (ब) द्वारे शेतकरी लवादाची निर्मीती करुन शेतीमाल दर शेतकºयांना मान्य नसल्यास लवादापुढे प्रकरण मांडून शेतकºयांना न्याय देणारी कायदेशीर व्यवस्था निर्माण केली पाहिजे. जमिनीचे फेरवाटप केले पाहिजे असे अनेक उपाय योजना अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी मांडले.
अशाच परिषद राज्यभर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड.डॉ. सुरेश माने लिखीत ‘शेती, शेतमजूरांचे मरण हेच सरकारांचे धोरण’ ही पुस्तिका, बीआरएसपीचे विदर्भ राज्य संयोजक दशरथ मडावी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. महापरिषदेला राजू झोडे, डॉ.गणवीर, प्रा. जावेद पाशा, छायाताई कुरुळकर, विशेष फुटाने, संजय गाढवे, प्रा. वामन शेडमाके व इतर वक्त्यांनी समयोचित भाषणे केली. महापरिषदेचे स्वागत पर भाषण पक्षाचे जेष्ठ नेते दुधकवर गुरुजी यांनी तर प्रास्ताविक श्रावण भानारकर यांनी केले. संचालन पक्षाचे भंडारा जिल्हा प्रभारी राजेश बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन मनोज बन्सोड यांनी केले. या परिषदेत विदर्भातील ग्रामपंचायत सरपंच निवडणूका बीआरएसपी विजयी उमेदवारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर पक्षाच्या वतीने आर्थिक सहाय्य पक्षाला अर्पण करुन पक्षाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: BJP government in central and state for capitalist interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.