भाजप सरकार शेतकरी, ओबीसी विरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:33 PM2019-02-15T21:33:33+5:302019-02-15T21:33:55+5:30

भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात अखिल भारतीय शेतकरी शेतमजूर माजी खासदार नाना पटोले यांनी केला.

BJP government farmers, anti OBC leaders | भाजप सरकार शेतकरी, ओबीसी विरोधी

भाजप सरकार शेतकरी, ओबीसी विरोधी

Next
ठळक मुद्देनाना पटोले : आष्टी येथे शेतकरी मेळावा, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात अखिल भारतीय शेतकरी शेतमजूर माजी खासदार नाना पटोले यांनी केला.
तालुक्यातील आष्टी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळीमाजी प्रदेश सचिव प्रमोद तीतीरमारे , माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भुरे, माजी नगराध्यक्ष अमरनाथजी रगडे, नगरसेवक बाळाभाऊ ठाकूर, माजी सभापती कलाम शेख,तुमसर तालुका अध्यक्ष शंकरजी राऊत,विधानसभा निरीक्षक गजानन झंझाड, युवक अध्यक्ष प्रफुल्ल बिसने, मोहाडी तालुका अध्यक्ष प्रभुजी मोहतुरे,माजी नगरसेवक कुंदा वैद्य, डॉ.पंकजभाऊ कारेमोरे,माजी सभापती कुसुमताई कांबळे, प्रदेश सचिव एन.एस.यु.आय शुभम गभने,पं.स सदस्य सुजाता कनपटे, शालीक शहारे, सिध्दार्थ रामटेके, नैनश्रीताई येळणे, नूतन भोले, गणेश सोनुसार, खुशाल पुष्पतोडे मंचकावर उपस्थित होते पुढे बोलताना देशात होणाºया शेतकाºयावरील अत्याचार, ओ.बी.सी, विद्यार्थी, रोजगार, वाढती बेरोजगारी व जातीच्या धर्माच्या व व्यक्तीमध्ये समाजामध्ये मतभेद निर्माण करून संविधानाला संपविण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे अश्या या सर्व मुद्यावर नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले.
या सरकारमुळे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. प्रत्येकाला धारकाला गॅस सिलेंडर दिले पण त्याचे हक्काचे केरोसीन तेल बंद केले तर राशन दुकानातील साखर सुध्दा बंद करण्यात आली. शासन पूर्ण आॅनलाइन च्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करत आहे. देशात बेरोजगारीची संखेत तीन वर्षात खूप वाढ झालेली आहे,तर भाजपा सरकारनि दोन करोड बेरोजगार देण्याचा भूलथापा देण्यात आले तर दोन कोटी रोजगार गेला कुठें ? ही सरकार देश्यात जुमलेबाजी करत आहे अशी टीका प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे यांनी केली.
माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे व माजी जि.प उपाध्यक्ष रमेशजी पारधी यांनी देखील शेतकºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपा चे माजी पं.स सदस्य शालीकराम शहारे यांच्या नेतृत्वात अभिनंद कांबळे, विनायक बोरकर, लालचंद गोलंगे,गोविंदा भलावी, ज्ञानेश्वर लाळे, कुशन सहारे रामनाथ रामटेके, मुन्ना उईके, शामराव चिंधालोरे, रुपलाल गोळगे, वसंत पंधरे, अभय भलावी, अनेक कार्यकात्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आले. तर शिवसेना मोहाडी तालुका प्रमुख पवन चौहान यांच्या नेतृत्वात शिवसैनिक ब्रिजलाल गभने, दशरथ बोरकर, रविंद्र वाडवे,बाळकृष्ण टेकाम, गजानन बसिने,धनराज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .कार्यक्रमाचे संचालन व आभार खुुशाल पुष्पतोडे यांनी मानले.

Web Title: BJP government farmers, anti OBC leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.