भाजपने हितोपयोगी योजना बंद केल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:24 AM2017-12-24T00:24:31+5:302017-12-24T00:26:13+5:30
शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला. काँग्रेसचे सरकार असताना १२०० कोटी रूपये गोसे धरणाला देण्यात आले परंतु त्यानंतर गोसे धरणाला एकही पैसा केंद्र सरकारने दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोसे धरणाला भेट दिली असता केवळ आश्वासने दिली. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत देशात निश्चीतच परिवर्तन होईल व त्याकरिता सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी याकरिता सज्ज राहवी व जनजागृती करावी, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी
केले.
नालंदा वसतीगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे, माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, मोहन सुरकर, नगरसेवक सानू बेग, शोभना गौरशेट्टीवार, जि.प. सदस्य तोमेश्वर पंचभाई, नगरसेविका माया चौसरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा शाल व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी शेतकºयांची व्यथा मांडली.संचालन डॉ.विजय ठक्कर यांनी तर आभारप्रदर्शन मुकेश बावनकर यांंनी केले.