भाजपचे हेमंत पटले यांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:59 PM2018-05-09T22:59:31+5:302018-05-09T23:00:06+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.

BJP nominated Hemant Patle for nomination | भाजपचे हेमंत पटले यांचे नामांकन दाखल

भाजपचे हेमंत पटले यांचे नामांकन दाखल

Next
ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस आज नामांकन दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.
याप्रसंगी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे प्रदेश संघटन सचिव डॉ.उपेंद्र कोठेकर, आमदार प्रा.अनिल सोले, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशीवार, आ.विजय रहांगडाले, आ.रामचंद्र अवसरे, आ.संजय पुराम, माजी खा. शिशुपाल पटले, खुशाल बोपचे, बाळा अंजनकर, माजी आ.केशवराव मानकर, भंडाराचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी उपस्थित होते. स्थानिक जलाराम मंगल कार्यालयातून हेमंत पटले हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मिरवणुकीद्वारे निवडणूक अर्ज सादर करण्यासाठी गेले. प्रमुख मार्गाने ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. नामांकन दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या रॅलीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्गदर्शन केले. या मिरवणुकीत दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीची पत्रपरिषद
राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी बुधवारला सायंकाळी संयुक्तरीत्या पत्रपरिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर कुकडे यांची उमेदवारी जाहीर केली. या पत्रपरिषदेला आ.प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, अनिल बावनकर, धनंजय दलाल, प्रेमसागर गणवीर यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: BJP nominated Hemant Patle for nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.