भाजप हा परिवाराचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:00 PM2017-09-02T23:00:56+5:302017-09-02T23:01:19+5:30
भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका परिवाराचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका परिवाराचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात व्यक्ती कोणतीही असो, कितीही मोठी असो महत्व कार्यकर्त्यांचेच आहे. आज लहान दिसणारा कार्यकर्ता केव्हा मोठा दिसेल याचा नेम नाही. सर्वांनी एकत्रित पणे पक्ष हित लक्षात ठेवून सर्व सामान्याचा उत्थानाकरिता कार्य केले पाहिजे. हीच पंडित दिनदयालजी उपाध्यक्ष यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भंडारा येथे आयोजित भाजपच्या कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी होते. यावेळी बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष खासदार नाना पटोले म्हणाले, मी शेतकºयांचा हितासाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त अन्य कोणताही पक्ष शेतकºयांच्या दुरगामी हिताचा निर्णय घेऊ शकत नाही. काही लोक माझ्या बाबतीत शंकेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये त्यांना यश मिळणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहे. तत्पूर्वी विदर्भ शिक्षक सेलचे संयोजक डॉ. उल्हास फडके यांनी संकल्प ते सिद्धी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी ग्रामपंचायत निवडणूक, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी जीएसटीवर तर जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे यांनी भाजपा भंडारा जिल्हा आवाहने व समाधान या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी ना.बावनकुळे यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चैतन्य उमाळकर यांच्या गीताने प्रारंभ झालेल्या सभेचे प्रास्ताविक प्रशांत खोब्रागडे यांनी तर संचालन अंगेश बेलपाडे यांनी केले. यावेळी आ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशीवार, भरत खंडाईत, नगराध्यक्ष सुनिल मेंंढे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, धनंजय मोहोकर, सविता ब्राम्हणकर, रामकुमार गजभिये उपस्थित होते.