अत्याचाराच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:36 AM2018-04-18T01:36:54+5:302018-04-18T01:36:54+5:30
जम्मू कश्मीर तथा उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ येथील महिला काँग्रेसच्या महिला सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळा दिवस पाळला व तहसीलदारामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जम्मू कश्मीर तथा उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ येथील महिला काँग्रेसच्या महिला सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळा दिवस पाळला व तहसीलदारामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे, एकता रोडगे, शिल्पा कुंभारे, स्मिता बोरकर, सविता ठाकुर, लता मालाधरे, गीता कुरंजेकर, सुरेखा सहारे, सुलभा हटवार, वनिता मलेवार, सुशिला पटले, संध्या गुर्वे, निशा गणवीर, गीता सूर्यवंशी, रंजना रामटेके, निलावंती चौहाण, ममता वासनिक, अस्मिता वाघमारे, अंजू राजाभोज, वेदांता गंगभोज, सुनंदा गणवीर, ओमिनी भुरे आदीसह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.